आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद किल्ल्याजवळ विद्यार्थ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निखिल कोठूळकर - Divya Marathi
निखिल कोठूळकर
दौलताबाद - जोगवाडा येथील प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी दौलताबाद परिसरात देवगिरी किल्ल्याच्या समोरील चिचेंच्या झाडाला गळफास घेऊन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. निखिल तुकाराम कोठूळकर रा. वालसावंगी, ता. भोकरदन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

रविवारी सकाळी गुराखी किल्ल्यासमोरील शाही हमाम भागात गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना चिंचेच्या झाडाला तरुणाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती दौलताबाद पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक डी. बी. कोपणकर, बी. के. पाचोळे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी निखिलची बॅग सापडली. त्यात त्याचा फोटो, मोबाइल, देवगिरी कॉलेजचे १२ वी विज्ञान शाखेचे २०१४- १५ वर्षाचे ओळखपत्र सापडले.

पुढे वाचा.. आठ दिवसांपासून शहरात