आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लो़ड: अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकासह तीन आरोपींवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- अल्पवयीन विद्यार्थिनीस सतत त्रास देऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकासह तीन आरोपींवर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून इफ्तेखार गुलाम रसूल देशमुख (२७, रा. अंबादासनगर, सिल्लोड) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

इफ्तेखार याने पीडित मुलगी शाळेत जात असताना अश्लील मजकूर लिहिलेली चिठ्ठी देत दुचाकीवर बसवून सोबत फिरण्यासाठी चल म्हणत असे. हा प्रकार मागच्या पाच महिन्यांपासून सुरू होता. गुरुवार, २० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पीडित शहरातील भाजी बाजारात भाजी घेण्यासाठी जात असताना इफ्तेखार गुलाम रसूल अन्य तीन अज्ञात आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. या वेळी इफ्तेखार गुलाम रसूल याने मुलीचा हात धरून विनयभंग केला. शहर पोलिस ठाण्यामध्ये सोमवार, २४ एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करून इफ्तेखार यास २५ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता शुक्रवार, २८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

दामिनी पथक कुठे? 
शहराच्या मध्यवस्तीतील भाजी मंडईत गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. भरबाजारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची हिंमत होत असेल तर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकाच्या कार्याबाबतही संशयाचे वातावरण तयार झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात जाऊन कारवाई करणे एवढ्यापुरतेच दामिनी पथकाचे कार्य राहिले आहे. 
बातम्या आणखी आहेत...