आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा : २५ विद्यार्थ्यांनी वर्षभर झटून बनवली ३५० सीसीची गाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजावाजा असलेल्या "बहा' या गाड्यांच्या स्पर्धेसाठी शहरातील जेएनईसी महाविद्यालयाची निवड झाली आहे. आराखड्याचा पहिला टप्पा पार करत जेएनईसीच्या अश्व टीमच्या २५ विद्यार्थ्यांनी तब्बल एक वर्ष दिवस रात्र एक करून शानदार गाडी तयार केली आहे. आता वेध लागले आहे ते १९ फेब्रुवारी रोजी इंदूर येथे होणाऱ्या अंतिम फेरीचे.
सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल इंजिनिअर्स या संस्थेकडून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी जगभरातील १३२ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार असून भारतातील ११० आणि औरंगाबादेतील जेएनईसी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहभाग आहे. जेएनईसी महाविद्यालय या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांनी ही गाडी चार लाख रुपये खर्च करून तयार केली आहे. बाजारात मात्र याची किंमत बारा लाखांपर्यंत आहे.
ही आहे महाविद्यालयाची टीम

कॅप्टन माधव कदम याच्या नेतृत्वाखाली पंडित बिरादार, शिरीष जगदाळे, सुमीत सोनवालकर, सुकृत पटवर्धन, अनिल तिळेकर, चेतन पाटील, चिराग पाटील, प्रसाद कुलकर्णी, गौरव झंवर, शुभम राठी, प्रतीक मंडलेच्छा, दिग्विजय मिरजगावे, आदिती वैद्य, सुरभी संघाई, सुयोग खिल्लारे, किरण हिवरे, युसूफ कबिरा, फरहान मोदी, अजिंक्य यादव यांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख डॉ. एम. एस. कदम, ए. बी. कुलकर्णी, एस. ए. धारूरकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

अशी आहे गाडी
इंजिन: ३०५सीसी, रिग्स अँड स्ट्रॅटन
खर्च: लाख६० हजार
आसनक्षमता : एक
पेट्रोलटँक : पाचलिटर
वजन: ३००किलो
कॅनडा आणि अमेरिकेहून गाडीचे काही भाग मागवले आहेत.

नोकरीची संधी

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी "बहा'चे आयोजन केले जाते. आयोजकांनी दिलेल्या नियमावलीनुसार गाडी तयार करावी लागते. ही गाडी कशाप्रकारे दिलेले अडथळे पार करते हे पाहिले जाते. विशेष म्हणजे ही गाडी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये स्वत: तयार करावी लागते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांकडून नोकरीची संधी मिळते.