आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''देवा मला पास कर'' आक्षेपार्हय लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्डात चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: " देवा तुझ्या पाया पडतो, मला पास कर मी मंदिरात पेढा ढेवीन, सर प्लीज मला पास करा, परिस्थिती हालाखीची आहे. यापुढे चांगला अभ्यास करील मात्र यंदा पास करा ."  अशा शब्दात भावनिक साद घालून आक्षेपार्हय लेखन उत्तरपत्रिकेत करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी बोर्डात करण्यात येणार असून, त्या विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे.अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.

 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यातच संपल्या आहे. आता निकालाचे वेध विद्यार्थी तसेच बोर्ड आणि शाळांना लागले आहे. निकाल तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. असे असले तरी परीक्षेच्या काळात गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रावर आणि केंद्रप्रमुख,केंद्र सहाय्यक तसेच कॉपी प्रकरणात आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची तदर्थ समितीसमोर सुनावणी आणि बोर्ड अधिकाऱ्यांच्या समिती समोर चौकशी सुरु आहे. त्यावर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई देखील करण्यात येणार आहे. याबरोबरच उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान दरवर्षी परीक्षेनंतरही काही गैरप्रकार समोर येतात.त्यातलाच एक भाग म्हणजे उत्तरपत्रिकेत आक्षेपार्हय लेखन करणे, खाना खुना करणे, चिन्हांचा वापर करणे आदी बाबींचा देखील समावेश हा गैरप्रकारांमध्ये मानला जातो. उत्तरपत्रिकेच्या तपासणीमध्ये यंदा देखील असे आक्षेपार्हय लेखन आढळून आले आहे.ज्यात कुणी भावनिक साद देत तर कुणी देवाच्या आई वडिलांच्या शपथा देत पास करण्यासाठी विनवनी केल्याचे आढळून आले आहे. अशा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी सांगितले.
 
 आक्षेपार्हय लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी - 
 परीक्षेच्या दरम्यान होणाऱ्या गैरप्रकाराबरोबरच परीक्षेनंतरचेही गैरप्रकार चौकशीसाठी घेण्यात आले आहेत. अनेक वेळा विद्यार्थी उत्तरपत्रिकांमध्ये भावनिकता आणत पास करा म्हणतात. देवाची शपथ पास करा असे काही उल्लेख करतात. असे प्रकार यंदाच्या परीक्षेतही आढळून आले आहेत. हे चुकीचे आहे. पेपर दरम्यान असे लेखन विद्यार्थ्यांनी करु नये.अशा सूचनाही शाळांना देण्यात येतात. परंतु तरी देखील असे प्रकार समोर येतात.त्यामुळे अशा प्रकरणांची चौकशी देखील करण्यात येत आहे.- शिशीर घोनमोडे विभागीय अध्यक्ष एसएससी बोर्ड
बातम्या आणखी आहेत...