आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 हजार विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून वंचित; मुदतीत अर्ज न भरल्याने फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शाळेत विद्यार्थिनींची उपस्थिती वाढवण्यासाठी देण्यात येणारी सावित्रीबाई फुले शालेय शिष्यवृत्ती यंदापासून ऑनलाइन करण्यात आली. अर्ज भरण्यासाठी 2 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. एक हजार शाळांतील मुख्याध्यापकांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज न भरल्याने 15 हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मागासवर्गीय मुलींना शासनाकडून शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन भत्ता मिळतो. पाचवी ते सातवीपर्यंत प्रतिवर्ष 600 तर आठवी ते दहावीपर्यंत प्रतिवर्ष एक हजार रुपये देण्यात येतात. याअगोदर विद्यार्थिनींचे अर्ज शाळेमार्फत जिल्हा परिषदेत जमा केले जात होते. या वर्षीपासून ही प्रक्रिया ऑनलाइन झाली. ऑनलाइन अर्ज भरण्याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर होती.
समाजकल्याण विभागाने अर्ज भरण्याचे प्रशिक्षणही दिले. 2 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना 15 हजार विद्यार्थिनींचे अर्ज भरले नाहीत. तर 1,488 शाळांतील 30 हजार मुलींचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मात्र
मुख्याध्यापकांनी त्याची माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दिली नसल्याने अर्ज केलेल्या मुलींची 13 लाख 73 हजारांची शिष्यवृत्ती मंजूर होऊनही वाटप करण्यात अडचणी आहेत. तरीही औरंगाबाद जिल्ह्याने सर्वात जास्त ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम केले असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मुख्याध्यापकच जबाबदार
अर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले. त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली होती. त्यांच्या दुर्लक्षामुळेच विद्यार्थिनींचे नुकसान झाले. अर्ज भरलेल्यांनी बी. स्टेटमेंट तत्काळ जमा करावेत.
-जय सोनकवडे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.