आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परीक्षेहून घरी परतलेल्या मराठी होलिक्रॉसमधील विद्यार्थ्याने सोमवारी (आठ एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भावसिंगपुरा भागातील कानिफनाथ कॉलनीत घडली असून योगेश मोतीलाल आगळे (14) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांनाही समजू शकले नाही.

आठवी इयत्तेत शिक्षण घेणारा योगेश सकाळी सात वाजता इंग्रजीची परीक्षा देण्यासाठी गेला होता. साडेदहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर बाथरूममध्ये अंघोळीला गेला. तेथेच त्याने पत्र्याच्या छताच्या लाकडी दांड्याला बँडेजच्या कापडी पट्टीने (जाळीच्या) गळफास घेऊन आत्महत्या केली. बराचवेळ झाला तरी योगेश बाहेर येत नसल्याचे पाहून त्याच्या आईने बाथरूमचा दरवाजा ठोठावला, परंतु आतून प्रतिसाद येत नसल्याने शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला तर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याचा मृतदेह तपासणीसाठी घाटीत पाठवला. या प्रकरणी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार अण्णासाहेब शेजवळ करत आहेत.