आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले, ती सतत मेसेज करून त्रास देते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात महिन्याभरात पुन्हा एका विद्यार्थ्याने गळफास घेतला. ‘ती सतत मेसेज करून मला त्रास देते,’ अशी चिठ्ठी लिहून वसतिगृह क्रमांक एकमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेश शंकर काेपूरवाड (२३, रा. माजलगाव) याने जीवनयात्रा संपवली. 
 
आत्महत्या करण्यापूर्वी गणेशने चिठ्ठी लिहिली होती. “ती मला सतत मेसेज करून त्रास देत आहे. मला विभागातही जाण्याची भीती वाटते. त्यामुळे मी जीवन संपवत आहे. उमेश मला माफ कर, आई-वडिलांची काळजी घे,’ असा मजकूर या चिठ्ठीत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वसतिगृहात प्रेमप्रकरणातून इतिहास विभागातील अमोल काकडे या विद्यार्थ्याने गळफास घेतला होता. गणेश हा संगणकशास्त्र प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून तो दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात आला होता. 
 
शिवाजी वसतिगृहात गणेशचा छोटा भाऊ उमेश एम. ए. अर्थशास्त्र विभागात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. त्याच्या खोलीत गणेश थांबला होता. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दोघा भावांनी मित्रांसोबत नाष्टा केला. त्यानंतर उमेश त्याचे रूम पार्टनर विभागात गेले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास उमेश रूमवर आला. त्याने दरवाजा ठोठावला असता काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता गणेशने बेडशीटने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. उमेशने मित्रांच्या मदतीने दरवाजा तोडून गणेशला घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, निरीक्षक दादाराव शिनगारे, उपनिरीक्षक राहुल रोडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 
 
तरुणीकडून धमक्या 
गणेश काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. एक तरुणी त्याला इतरांच्या फेसबुक अकाउंटवरून धमक्या देत असल्याचे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. त्याचे वडील माजलगाव तहसील कार्यालयात पेशकार आहेत. 
 
विद्यापीठात परवानगी न घेता राहतात विद्यार्थी : विद्यापीठातील वसतिगृहात अनेक विद्यार्थी विनापरवानगी राहतात. मित्रांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वसतिगृहात राहतात. एका खोलीत किती मुले राहतात, त्यांचा होस्टेलला नंबर लागला आहे का, याचीही नोंद प्रशासनाकडे नसल्याचेही समोर आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...