आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागात प्रवेशासाठी एका विद्यार्थ्याने हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अमरदीप लब्दे असे त्याचे नाव असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. तरी देखील त्याला शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केल्यामुळे हताश होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले. रक्तबंबाळ झाल्यानंतर विभागातील प्राध्यापक नरमले आणि सोमवारी (१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजता त्याला प्रवेश देऊन प्रकरण चव्हाट्यावर येणार नाही, याची काळजी घेतली.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक माफ असून त्यांचे परीक्षा शुल्क समाजकल्याण विभाग अदा करत असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क अथवा कुठल्याही प्रकारचे शुल्क वसूल केल्यास प्राचार्य, विभागप्रमुख अथवा जबाबदार व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. यासंदर्भात राज्य शासनाने ‘जीआर’ जारी केलेला आहे. तरीही विद्यापीठातील संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागाने अमरदीपला फी भरण्याची सक्ती केली. अमरदीपची घरची परिस्थिती हलाखीची आहे. २०१४-१५ दरम्यान त्याने विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. पण त्यावेळी त्याने कुठलीही प्रक्रिया केल्यामुळे त्याचा प्रवेश रद्द ठरवण्यात आला होता. आता अचानक तो, शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख यांनी डॉ. भारती गवळी यांच्याकडे पदभार दिला होता. डॉ. गवळी यांनी मात्र विभागीय समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विभागीय समितीने अमरदीपला शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याला पदव्युत्तर पदवीच्या विभागात पाठवण्यात आले होते. तिथेही त्याला शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे हताश होऊन साडेअकरा वाजता त्याने ब्लेडने हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत विभागाचे कर्मचारी विजय जाधव यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

उपचारानंतर पुन्हा विभागात येऊन त्याने प्रवेश देण्याचा हट्ट केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सर्व प्राध्यापकांनी त्याला प्रवेश देण्यासाठी शिफारस केली दुपारी साडेबारापर्यंत त्याचा प्रवेश नक्की करण्यात आला. मात्र घडल्या प्रकाराबद्दल कुठलीही वाच्यता करण्याची त्याला तंबी देण्यात आली होती. दरम्यान, विद्यापीठातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बोरीकर यांना घडलेला प्रकार कळाल्यानंतर त्यांनी सायंकाळी साडेचार वाजता विभागात धाव घेतली. तत्पूर्वी त्यांनी माजी बीसीयूडी संचालक तथा विभागाचे प्राध्यापक डॉ. के. व्ही. काळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला होता.
बातम्या आणखी आहेत...