आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या अट्टहासामुळे वाढतेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलांच्यापाठीवरील दप्तराच्या वाढत्या ओझ्यास शाळांप्रमाणेच पालकही तितकेच जबाबदार आहेत. स्पर्धेच्या नादात मुलांना हे आले पाहिजे, ते आले पाहिजे, असे म्हणत त्यांच्या अपेक्षा वाढत जातात आणि त्यानुसारच शाळांमध्येही अॅक्टिव्हिटी सुरू होऊन दप्तराचे ओझे वाढते, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळा, पालक आणि मुख्याध्यापकांत समन्वय असावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यासंबंधी नियुक्त समितीचा अहवाल शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधिमंडळात सादर केला. या अहवालातील शिफारशींप्रमाणे पहिलीत मुलाच्या दप्तराचे ओझे हे दोन किलो आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, असे म्हटले आहे. तसेच पालकांनी आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे पाल्याच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे ना याची काळजी घ्यावी. वह्या-पुस्तकांचे वजन करून ते तपासून घ्यावे, अशा सूचनाही केल्या आहेत. याअनुषंगाने "दिव्य मराठी'ने पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला असता दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी शिक्षक आणि पालक या दोघांचे सहकार्य असावे, असा सूर व्यक्त झाला.

शाळांमध्ये लॉकर हवेत
बऱ्याचइंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लॉकर दिले जातात. अधिकाधिक प्रात्यक्षिकावर भर आणि सर्वच शाळांमध्ये जेवढे तास तेवढेच दप्तर असा उपक्रम राबवायला हवा. परंतु पालकांच्या अपेक्षांचे ओझे आज दप्तरांत वाढले आहे. गरज नसताना पालकही आग्रही भूमिका घेतात. त्यासाठी पालकांनीही विचार बदलण्याची गरज आहे. आशा कोचुरे,

शिक्षक पालक दोघांचे सहकार्य हवे
- शिक्षकआणि विद्यार्थी शाळा भरल्यापासून ते सुटेपर्यंत सोबत असतात. तोपर्यंत विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्यावर असते.परंतु पालकांनीही मुलांना शाळेत पाठवताना त्यांचे दप्तर बघावे. बऱ्याच वेळा ट्यूशनच्या वह्यासुद्धा मुले शाळेत आणतात. परिणामी दप्तराचे ओझे वाढते. शिक्षणमंत्र्यांचा निर्णय आणि समितीच्या सूचना योग्यच आहेत, परंतु दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी पालकांचीही आहे. शाळेत तसे तासिकेनुसारच दप्तर आणण्यास सांगितले जाते. राहिला प्रश्न लर्निंगचा. तर तो सर्वच शाळांना शक्य होईलच असे नाही. उज्ज्वलानिकाळजे -जाधव, शारदा मंदिर कन्या प्रशाला

गरजेनुसार पुस्तके हवी
- एकशिक्षक आणि पालक या नात्याने खरे तर मुलांना ज्या साहित्याची अथवा पुस्तकांची गरज आहे तेवढेच दप्तरात असावे. पालकांनी जास्त अट्टहास करायला नको. बऱ्याच वेळा गरज नसताना दप्तराचे ओझे वाढवले जाते. मुलांना हसत खेळत शिक्षण मिळायला हवे. राजश्रीपोहेकर, पालक