आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई अॅडव्हान्समध्ये विद्यार्थी चमकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल (रविवार) सकाळी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून त्यांना देशातील नामांकित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळेल.

औरंगाबाद शहरास यंदा प्रथमच जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी केंद्र मिळाले होते. तीन केंद्रांवर झालेल्या या परीक्षेस बाराशेवर अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा ही परीक्षा आयआयटी गुवाहाटीद्वारे आयोजित करण्यात आली होती. आता निकालानंतर २० जून ते १९ जुलैदरम्यान अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यशवंतांना नामांकित आयआयटीबरोबरच राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही प्रवेश घेता येईल.

'नारायणा'चासुशांत राठी ८३ वा : नारायणाइन्स्टिट्यूटने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी सुशांत राठी याने देशात ८३ वी रँक मिळवली आहे. इतर यशस्वी विद्यार्थ्यांत सिद्धांत जाधव (१९८ रँक), उमंग छावरिया (४७१), शेखर मोरे (१८९),श्रेयस माहेश्वरी (७५२), प्रियंका रोटे (१३६६) रँक, सिद्धार्थ नहार (१५७९), प्रसाद क्षीरसागर (१५८०), महेश साबू (१३७१ रँक). यशस्वी विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एम. एफ. मल्लिक यांनी सांगितले की, ७५ गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. १३३ पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा क्रमांक पाच हजारपेक्षा कमी असेल. यानुसार औरंगाबाद शाखेतून कमीत कमी ६० विद्यार्थी पाच हजार ऑल इंडिया रँकचे असतील, तर शंभरहून अधिक विद्यार्थी पात्र ठरतील.

स्निग्धाचे यश : जेईई अॅडव्हान्स परीक्षेत शहरातील स्निग्धा सुरेश दळवी हिने २५१ वा रँक मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे आईवडील तसेच मित्रपरिवारामध्ये अभिनंदन होत आहे.

सर्व्हर डाऊनचा फटका
जेईईअॅडव्हान्स परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी अन् पालकांचे लक्ष लागले होते. संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी पालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...