आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरडे रंग उधळून विद्यार्थ्यांनी जाणून घेतले मल्चिंग तंत्र!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाण्याची नासाडी करत रंगांचा आनंद घेण्यापेक्षा कोरडे रंग खेळून पाण्याची बचत आणि आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद शाळा खामखेडा येथील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी साजरी केली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मल्चिंग तंत्रज्ञानाने वृक्ष संवर्धन कसे करायचे याची माहितीही दिली. 

दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत शाळेत शिक्षकांकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. या वेळी शिक्षकांनी वृक्ष संवर्धन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मल्चिंग तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी इको फ्रेंडली होळीचे महत्त्वही पटवून दिले. मुख्याध्यापक मुकुंद कुलकर्णी, शिक्षक सदानंद माडेवार, जगतसिंग राजपूत, सचिन एखंडे यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली होळीबाबत माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगानेच होळी खेळण्याची प्रतिज्ञा घेऊन शिक्षकांसह मुलांनी धूलिवंदनचा मनसोक्त आनंद लुटला. 
परिपाठानंतर विद्यार्थ्यांना या उपक्रमाची कल्पना देण्यात आली. या वेळी मुलांनी शिक्षकांना विविध प्रश्ने विचारली. शाळेतील वृक्षांचे संवर्धन तर आपण दररोजच करतो. मग आज काय करायचे, असा पहिलाच प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आणि त्याचे उत्तर त्यांच्या कृतीतूनच त्यांना मिळाले.
 
 विद्यार्थ्यांनी शाळेत येताना टिकाव, फावडे, खुरपे आणि भुसा आणावा असे शिक्षकांनी सांगितले होते. त्यांनीही ते सर्व साहित्य सोबत आणले होते. मग त्यांना शिक्षकांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली. 
 
यालाच म्हणतात मल्चिंग तंत्रज्ञान 
उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे झाडांना पाणी कोण देणार? त्यासाठी झाडांना आळे करून त्यात भुसा टाकला जातो. त्यामुळे पाणी जास्त काळ टिकून राहील उन्हाळ्यातही आपली झाडे जगतील. हेच मल्चिंग तंत्रज्ञान आह, असे शिक्षकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी कामाला लागले.
 
बातम्या आणखी आहेत...