आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Prefere Mumbai, Pune For The Engineering

विद्यार्थ्‍यांची अभियांत्रिकीसाठी मुंबई, पुण्याला पहिली पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभियांत्रिकीत प्रवेश घेणार्‍या 60 टक्के विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीत मुंबईतील महाविद्यालयांची निवड केली. यानंतर पुणे, नागपूरला पसंती मिळाली. शहरातील मोजक्याच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. 16 जुलै रोजी सुरू झालेली फेरी बुधवारी संपली. या प्रक्रियेत राज्यभरातील 4,247 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विशेष म्हणजे यंदा अभियांत्रिकीच्या 45 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

राज्यभरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयानंतर चांगला कॅम्पस, प्राध्यापक, होस्टेल या सुविधा असलेल्या खासगी महाविद्यालयाला पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली. चंद्रपूरसारख्या भागात शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत असतानाही तेथे जाणे अनेकांनी टाळले. प्रवेश प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. पी. अडवाणी, आर.के. र्शीवास्तव, डॉ. प्रणेश मृणाल, प्रा. संजय चिकलठाणकर, प्रा. उमेश हंबिरे यांच्यासह 100 स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणार्‍या मुलांची मेकॅनिकल ट्रेडसाठी, तर मुलींची आयटी आणि कॉम्प्युटरसाठी पसंती होती. त्यामुळे राज्यातील या शाखांची प्रवेश प्रक्रिया इतर विषयांपेक्षा लवकर संपली. सर्वच महाविद्यालय यापूर्वीच सुरू झाले असले तरी या समुपदेशन फेरीतील विद्यार्थ्यांना 27 जुलैपर्यंत महाविद्यालयात हजर राहायचे आहे. राज्यातील सुमारे 800 महाविद्यालयांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. शासकीय महाविद्यालयाचे खुल्या वर्गाचे शुल्क 52 हजार, तर खासगी महाविद्यालयांचे शुल्क 60 हजारांपेक्षा जास्त आहे.


प्रमुख दहा महाविद्यालये
0 व्हीजीटीआय (वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई)
0 सीओईपी (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे)
0 पीआयसीटी (पुणे)
0 के. के. वाघ अभियांत्रिकी महा. नाशिक
0 एसएनडीटी, उषा मित्तल अभियांत्रिकी, मुंबई
0 जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, नागपूर
0 सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव, पुणे
0 रामदेवबाबा टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नागपूर
0 यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
0 एमआयटी, पुणे