आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही घेतोय पाल्यांच्या सुरक्षिततेची काळजी, "दिव्य मराठी'च्‍या अभियानाला प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शालेयमुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाच्या शेजारी मुलांना बसवू नका, नियमांचे पालन करा, मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, यासंदर्भात
"दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या अभियानाला शहरातील पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत, अशा प्रतिक्रिया
अनेक पालकांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिल्या.
शाळा, महाविद्यालयांत मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच इतर वाहनचालकांवर पालक विश्वास ठेवतात. मात्र, एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या
घटनेनंतर पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर पोलिस आयुक्तांनी वाहनचालकांना आपल्या शेजारील सीटवर मुला-मुलींना बसवण्यास बंदी घातली.
तरीही आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करीत अनेक रिक्षा, मिनीडोर आणि ओम्नी कारचालक विद्यार्थ्यांना शेजारील सीटवर बसवत आहेत. मुलांवरील लैंगिक अत्याचार
टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी वाहनचालकांना तंबी दिलेली असतानाही शहरातील रस्त्यांवरील हे चित्र अजूनही बदलले नाही.
कधीहोणार कारवाई ?
पोलिसआयुक्त राजेंद्र सिंह यांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना इशारा दिल्यानंतरही अनेक रिक्षा मिनीडोरचालक आपल्या वाहनांमध्ये मुला-मुलींना
दाटीवाटीने बसवत आहेत. मुला-मुलींना अजूनही ड्रायव्हर सीटशेजारी बसवणे सुरू आहे. या प्रकारामुळे काही मुली अत्याचारास बळी पडल्या आहेत. बदनामी आणि
भीतीपोटी असे प्रकार समोर येत नाहीत, परंतु मुलगा असो वा मुलगी, दोघांच्या सुरक्षिततेची काळजी असायलाच हवी. यामुळे शाळांनी रिक्षाचालकांची आणि
जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यास सुरुवात केली अाहे. तसेच आता पालकही सजग झाले असून मुलांना शाळेत सोडण्यापासून ते घरी येईपर्यंत वाहनचालक कशी
वागणूक देतात याची काळजी घेत आहेत.
चालकाजवळ बसू देत नाही
-माझीदोन्ही मुले रिक्षानेच शाळेत जातात. सुरुवातीला काही वेळ त्यांना ड्रायव्हर सीटजवळच बसवले जात असे. जास्त मुले असल्याने तो बसवत असेल असे वाटले. परंतु
ज्या घटना समोर येत आहेत त्या भयावह आहेत. मुलगा असो वा मुलगी, दोघांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. म्हणून रिक्षावाल्याला आता मुलांना मागेच बसवायला
सांगते. मुले रिक्षात बसून जाईपर्यंत काळजी घेते. मीनलसोनवणे, पालक
- ड्रायव्हरजवळ बस, असे कुणीही कितीही सांगितले किंवा कुणी बोलावले काही दिले तरी घ्यायचे नाही, अशी सूचना मुलांना नेहमीच देतो. परंतु काही वेळा नजर चुकवून
मुले ड्रायव्हरजवळ बसतात. मात्र आता तसे नाही. मुलांना इतर मुलांसोबत मागेच बसण्यास सांगितले. मुलेदेखील आता ड्रायव्हरजवळ बसत नाहीत. स्वातीकाळे, पालक

आपलीही जबाबदारी
-सुरुवातीलादप्तर लोंबकळत मुले रिक्षाचालकाशेजारी बसत होती, पण आता त्यांना तेथे बसू देत नाही. रिक्षाचालकांनाही तशा सूचना दिल्या आहेत. कारण एक पालक
म्हणून जोपर्यंत आपण काही करणार नाहीत तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. आशाकांबळे, पालक