आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांचे यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अथर्व पवार, स्वस्तिक करवा, मिताली बांते)

औरंगाबाद- सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने दिल्लीत घेण्यात आलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये औरंगाबादच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. देशभरातील १४०० शहरांतील ३१ हजार ५०० विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग होता. पोदार इंटरनॅशनलचा अथर्व पवार, वसंतराव नाईक महाविद्यालयाची मिताली बांटे, नाथ व्हॅलीचा स्वस्तिक करवा यांनी यश संपादन केले.
दिल्लीतील चिन्मय मिशन आश्रमच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. इस्रोचे पद्मश्री प्रा. वाय. एस. राजन, इंडिया ब्रिटिश कौन्सिलच्या शिक्षण केंद्राचे व्यवस्थापक मायकेल गार्डन, गुरगावच्या मेडिसिटी हॉस्पिटलच्या युरॉलॉजी संशोधन केंद्राचे पद्मश्री डॉ. एन. पी. गुप्ता यांची उपस्थिती होती. संस्थेचे कार्यकारी संस्थापक महावीर सिंग या वेळी म्हणाले, गेल्या १८ वर्षांपासून ही परीक्षा घेतली जाते. १९ देशांतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. ३५०० शाळांतील २४ हजार विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याची कामगिरी या परीक्षेच्या माध्यमातून केली जाते.
बातम्या आणखी आहेत...