आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठ्यपुस्तकातील पात्रे जिवंत होणार, "अभ्यास जत्रा' उपक्रमाला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळेच्या आवारातच पाठ्यपुस्तकातील पात्रे जिवंत होऊन ती मनोरंजन करीत विद्यार्थ्यांना शिकवू लागली तर आश्चर्य वाटायला नको. असाच काहीसा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस आहे. या उपक्रमास "अभ्यास जत्रा' असे नाव देण्यात आले असून नवीन शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे.

शाळा सुरू होताच ती कधी सुटेल याकडे अनेकदा विद्यार्थ्यांचे लक्ष असते."नकोच मजला पाटी-पुस्तक, असावी हसत खेळत शाळा' हे बालविद्यार्थी मित्रांच्या मनातील शाळेचे खरे चित्र आहे. परंतु वाढती स्पर्धा आणि त्यात टिकाव धरण्यासाठी पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रमात होणारे बदल, दरवर्षीचे नवीन नियम यामुळे अभ्यासाचा ताणतणावही वाढतो आहे.

तो हलका करण्यासाठीच "अभ्यास जत्रा' हा मनोरंजनातून शिक्षणाचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीची कल्पना शिक्षण हक्क कायद्यातूनच सुचली असून अवघड वाटणारे गणित, विज्ञान, इतिहास, इंग्रजी या विषयांची भीती तसेच मराठी भाषेच्या जतनासाठी अभ्यासाबरोबरच मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या अवांतर पुस्तकांचे वाचनही होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक
-प्राथमिकस्तरातूनच विद्यार्थ्यांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठीच खरे तर ही अभ्यास जत्रा या वर्षीपासून सुरू करायची होती. आता ती नव्या शैक्षणिक वर्षात २०१५ मध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रियाराणीपाटील, शिक्षणाधिकारी,जि. प.
असा असेल उपक्रम
विद्यार्थ्यांबरोबरचशिक्षकांनाही अनेकदा शिकवण्यात अडचणी येतात. परंतु मुलांमध्येच एकत्र होऊन पाठ्यपुस्तकातील पात्रे जिवंतपणे साकारून तसेच चित्रांच्या माध्यमातून, पोस्टरद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे. त्यासाठी खास एक दिवस जत्रेप्रमाणेच वर्ग सजवून हा उपक्रम व्हावा.