आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून आल्या फाटक्या, कुरतडलेल्या नोटा; नोटा बदलून देण्यास महाराष्ट्र बँकेचा नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा परिसरातील बीड बायपास रोडवर एका प्राध्यापकाने एटीएममधून १० हजार रुपये काढले. काढलेल्या या नोटा फाटक्या, कुरतडलेल्या, चिकटवलेल्या अन् शाई लागलेल्या निघाल्या. आता या नोटा बदलून घ्यायच्या म्हणून ते लगतच्याचा बँकेत गेले. मात्र, याच्याशी आमचा संबंध नाही, असे उत्तर देऊन त्यांना नोटा एटीएममध्ये टाकणाऱ्या एजन्सीकडे जाण्यास सांगण्यात आले. प्राध्यापकांनी एजन्सीशी संपर्क केला. तेव्हा त्यांनीही या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, असे सांगितले. त्यामुळे आता या नोटा बदलून देणार तरी कोण या चिंतेने प्राध्यापक त्रस्त झाले आहेत.

 

बीड बायपास रोडवरील सावित्री लॉन्सजवळ महाराष्ट्र बँक आहे. बँकेलगतच त्यांचे एटीएम मशीनदेखील आहे. दुपारी च्या सुमारास येथून प्रा. राहुल पंडित यांनी एटीएममधून १० हजार रुपये काढले. यात संपूर्ण नोटा या ५०० रुपयांच्या होत्या. जेव्हा नोटा मोजायला सुरुवात केली तेव्हा त्या चक्क फाटक्या, कुरतडलेल्या, चिकटवलेल्या अन् शाई लागलेल्या दिसल्या. हा प्रकार समाेर येताच त्यांनी बँकेत जाऊन तेथील मॅनेजरची भेट घेतली. झालेला प्रकार सांगितला. त्यांनी पंडित यांना कॅशियरकडे पाठवले. कॅशियरने कॅश बदलून देण्याची आमची जबाबदारी नसल्याचे सांगितले. एटीएममध्ये बँक नव्हे तर विशिष्ट कंपन्या पैसे भरतात असे सांगून कॅशियरने दोन फोन नंबर दिले तेथे जाऊन पैसे बदलण्याचा सल्ला दिला. पंडित यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क केला मात्र ही आमची जबाबदारी नाही, तुम्ही बँकेतच जा असे उत्तर मिळाले. आता हे पैसे बदलून देणार कोण? असा प्रश्न पंडित यांच्यापुढे आहे.

 

एटीएममध्ये आम्ही फक्त पैसे भरतो
आमची एजन्सी केवळ एमटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. असे प्रकार घडल्यास संबंधितांनी ज्या बँकेचे एटीएम आहे त्या बँकेच्या मुख्य शाखेत जावे.
- सचिन गायकवाड, एजन्सी कर्मचारी

 

जबाबदारी कुणाची
बँकाएटीएम मशीनमध्ये पैसे भरत नाही. पैसे भरण्यासाठी विविध एजन्सींची मदत घेतली जाते. प्रत्येक बँक अशी एजन्सी नेमते. बँक एजन्सीला पैसे देते आणि एजन्सी ते एमटीएममध्ये भरतात. त्यामुळे अंतिमतः ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे हे मात्र कळायला तयार नाही.

बातम्या आणखी आहेत...