आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजप युतीचा संसार सुर‌ळीत सुरू : सुभाष देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीचा संसार आनंदात सुरू असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमची युती नक्की होईल, असे सूतोवाच शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. सर्जिकल स्ट्राइकवरून असलेले श्रेय कोणी घेता ते सीमेवरच्या सैनिकांनाच द्यावे. त्याचे राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. पाकिस्तानचे तीन तुकडे केले तर भारतात आणखी चांगली शांतता नांदेल, असेही मतही त्यांनी व्यक्त केले.
शिवसेना-भाजपमध्ये सर्जिकल स्ट्राइकवरून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू आहे काय? तशी पोस्टरबाजी मुंबईत सुरू आहे? तुमच्यात काही मतभेद आहेत काय? युतीचा संसार सुरळीत सुरू आहे ना? या पत्रकारांच्या प्रश्नांवर सुभाष देसाई म्हणाले की, आमचा संसार आनंदात आणि सुरळीत सुरू आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होईल. ती करावीच लागेल; पण सर्जिकल ऑपरेशनवरून जे पोस्टर वॉर रंगले आहे ते थांबवावे. त्याचे श्रेय सैनिकांना द्यावे, असा टोला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लगावला.
कृष्णा खाेऱ्यातून पाणी
ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने काही मागण्या ऐनवेळी मुख्यमंत्र्यांना दिल्या. मराठवाड्याला ४९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी २४ टीएमसी पाणी पावसातून मिळू शकते. उर्वरित तूट २५ टीएमसी पाणी कृष्णा खोरे, १० टीएमसी नीरा,भीमा नद्यांचे पाणी, उजनीचे पाणी यातून भरून काढता येईल, असे सुचवले आहे.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने उचलावा
मराठवाड्यातील क्रिमिलेयर गटातील सर्वच विद्यार्थ्यांचे उच्चतंत्र, वैद्यकीय परदेशी शिक्षणाचे शुल्क शासनाने सरसकट भरावेत, अशी मागणी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या वतीने सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांनी केल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...