आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Lomte News In Marathi, Left Party, AAP, Aurangabad Lok Sabha Constituncy

लोमटेंना पाठिंब्यासाठी डाव्यांचा दिल्लीशी संपर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांना पाठिंब्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकत नाही. ‘आप’चे पत्र प्राप्त झाले असून पॉलिट ब्युरोला कळवण्यात आले आहे. दिल्ली येथे जो निर्णय होईल त्याप्रमाणे येथील लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली जाईल, असे प्रा. राम बाहेती यांनी स्पष्ट केले आहे.
लोमटे यांनी भाकपकडे पाठिंबा मागणारे पत्र दिले आहे. त्यानुसार जिल्हा कार्यालयात माजी नगरसेवक अश्फाक सलामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी आपने कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. लोमटे हे श्रमिक, कष्टकरी समाजासाठी लढणारे लढवय्ये कार्यकर्ते असल्याचे मान्य असले तरी त्यांच्या पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि येथे पाठिंब्यासाठी केलेली मागणी दिल्ली येथील वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आली आहे. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे लोमटे यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येईले. त्यांना तसे लेखी कळवण्यात येणार असून त्यानंतरच प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय होईल.