आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबाद ग्राहक मंचचे सुब्रतो रॉयवर अटक वाॅरंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादमधील ‘सहारा’ सिटी प्रकल्पात फ्लॅट बुक करून पैसे भरलेल्या ग्राहकांना फ्लॅट अथवा रक्कम परत न केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने सहारा समूहाचे चेअरमन  सुब्रतो रॉय यांच्यासह सहा संचालकांविरुद्ध वॉरंट जारी केले असून २३ नोव्हेंबर रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.   

याप्रकरणी अमरजितसिंग नाथराम बग्गा आणि अनिल सावे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे  तक्रार दाखल केली होती. गांधेलीतील ८२ एकरांवरील सहारा सिटीत अर्जदारांनी २०११ मध्ये दोन लाख ८ हजार ६०० रुपये भरुन फ्लॅट बुक केले होते. करारानुसार तीन वर्षांत  घर मिळायला हवे होते. परंतु तेथे बांधकामही सुरू झाले नाही. या प्रकरणी ग्राहक मंचाने  अर्जदारांचे पैसे १२ टक्के व्याजासह ३० दिवसांत देण्याचे अादेश दिले हाेते. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर वाॅरंट काढण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...