आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subsidy On Farmponds Solar Electricity Production,Ajit Pawar Information

शेततळ्यांवर सौर वीज निर्मितीसाठी अनुदान,अजित पवारांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाचे सौरऊर्जेबाबतचे धोरण लवकरच जाहीर केले जाणार असून शेततळ्यांच्या जागेवरच 3 ते 5 एच.पी.ची मोटार चालवली जाईल इतकी वीज निर्मिती करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासगी उत्पादकांनी निर्माण केलेली सौर वीज शासन विकत घेणार नाही. त्यांनी खासगी क्षेत्रात कोठेही विक्री करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेततळ्यांच्या जागेवर सौर पॅनल टाकल्यानंतर 3 व 5 हॉर्स पॉवरची मोटार चालू शकेल इतकी वीज निर्मिती होते. त्यावर आठ ते दहा तास पंप चालू शकतो, हे प्रयोगातून सिद्ध झाले असल्याने विजेअभावी पिके वाळली, असे यापुढे होणार नाही. त्यासाठी काय करायचे ते लवकरच ठरवले जाणार आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या पंपापर्यंत वीज पोहोचती करण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो. प्रतियुनिट सव्वासहा रुपये नंतरचा हा खर्च आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांकडून 60 पैसे घेतले जातात. तफावतीचा खर्च सौरऊर्जेच्या अनुदानावर खर्च केल्यास शेतकर्‍यांची तक्रार कायमची नाहीशी होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जेला प्राधान्य दिले जाणार आहे. महाजनको ही अर्धशासकीय कंपनी सौरऊर्जेची निर्मिती करेल. तीच फक्त शासन विकत घेईल. अनेक जण खासगी प्रकल्प टाकून सौर वीज विकत घ्या, असे म्हणतात; पण तसे होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.