आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी लष्करी अधिका-यांना जामीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड- उपनगर पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या लष्करातील प्रशिक्षणार्थी लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. किरकाेळ कारणावरून लष्करी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी उपनगर पाेलिस ठाण्यावर हल्ला करून प्रत्त्युतर दिले हाेते. हल्ल्यात पाेलिसांना मारहाण, साहित्याची ताेडफाेड करण्यात अाली.

घटनेनंतर अाशिष बागुल, निशांत एस. रेड्डी, जिफेन जाॅर्ज, मनाेज माेहनलाल केशवाणी, अविनाशकुमार, अमितकुमार शाह, अर्पित राकेश तिवारी, संजय मुरलीधर जाेशी, मनीचैतन्य रामचंद्र साहू, राहुल रवींद्र दास, महेंद्र प्रतापसिंग, पारस लक्ष्मीसिंग बसेडा, नेलीब्रर रविंद्रमाेहन झा, रणधीर कुलबेरसिंग, राजन श्रीराम शर्मा, कंवरदीप गुरमेलसिंग, रजत राकेशकुमार यादव, रणवीरकुमार, वैभव शर्मा या १८ जवानांना अटक केली हाेती. यासर्वांना गुरुवारी दुपारी नाशिकराेडच्या दिवाणी फाैजदारी न्यायालयात न्यायाधीश ए. डी. वामन यांच्या समाेर हजर करण्यात अाले.

न्यायालयीन प्रक्रियेच्या वेळी सीबीअायचे सरकारी वकील अजय मिसर यांच्यासह पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण, अविनाश बारगळ, यांच्यासह लष्कराचे सुप्रित गील, ब्रिगेडियर संजीव तिवारी, जे. एस. बराड, अनुप बरबरे उपस्थित हाेते.
न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अॅड. अंजना नवगिरे यांनी बाजू मांडली. दाेन्ही बाजूचे म्हणणे एेकून घेऊन न्यायाधीश ए. डी. वामन यांनी संशयितांना न्यायालयीन काेठडी सुनावली. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. पाेलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना नाशिकराेडच्या न्यायालयात अाणले असताना परिसराला छावणीचे स्वरूप अाले हाेते.

चाैकशीअंती दाेषींवर कारवाई हाेणारच
उपनगरपाेलिस ठाण्यावर जवानांनी केलेला हल्ला हा अार्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी असणाऱ्या अधिकाऱ्यास मारहाण करण्यात अाल्यानंतर घडलेला प्रकार अाहे. संबंधित अधिकारी रजेवर हाेता अाणि काैटुंबिक वादासंदर्भात पाेलिस स्थानकात गेला हाेता. त्याच्यासमवेत गैरवर्तन झाले त्यास पाेलिसांकडून ताब्यात घेण्यात अाल्याचेही निदर्शनास अाले हाेते. पाेलिस अाणि लष्करी अशा दाेन्ही पातळ्यांवर या घटनेची चाैकशी करण्यात येत असून चाैकशीअंती त्यात दाेषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात येत अाहे. महेशअय्यंगार, जनसंपर्कअधिकारी, संरक्षण मंत्रालय, पुणे