आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Police Investigation In Murder Case At Aurangabad

चुलत भावाने काढला काटा, अमितेश कुमारांमुळे उलगडले खुनाचे गूढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आंबेडकरनगरातील तुकाराम साहेबराव मकळे या २५ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या कारणावरून नोव्हेंबर २०१५ रोजी चुलत भावानेच खून केला असल्याचे तपासत उघड झाले आहे. खुनाच्या आरोपाखाली मारुती चिमा मकळे याला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एक विधिसंघर्ष बालक असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
आंबेडकरनगरातील गल्ली क्रमांक चारमध्ये तुकाराम मकळे सहकुटुंब राहत होता. त्याच गल्लीत त्याचा चुलत भाऊ मारुती राहतो. नोव्हेंबर २०१५ रोजी त्याच्या घरामागे तुकाराम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले होते. नोव्हेंबरला तुकारामची पत्नी सुनीताने पोलिसांत तुकारामचा मारहाणीत मृत्यू झाला असल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. बी. कोते यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का काढावा लागाला दफन केलेला मृतदेह....
-काय आहे घटनेचे खरे कारण... कोण पकडत होते डुक्कर...