आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृछत्र गेले, 4 भावंडांचा सांभाळ; हलाखीतही विशाखाची गगनभरारी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यासोबत एका प्रसंगात विशाखा. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यासोबत एका प्रसंगात विशाखा. - Divya Marathi
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यासोबत एका प्रसंगात विशाखा. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यासोबत एका प्रसंगात विशाखा.
औरंगाबाद- अर्धांगवायूने वडील अंथरूणाला खिळलेले, पाच वर्षांच्या बिनपगारी रजांमुळे आर्थिक हलाखी. तशातच वडील गेले व आईसह तीन बहिणी, भावाची जबाबदारी येऊन पडली. मोडून पडावे अशी परिस्थिती. पण न डगमगता धीराने तोंड देत स्वत:चे उत्तम करियर घडवणाऱ्या, भावंडांनाही चांगले शिक्षण देणाऱ्या सामान्य कुटुंबातील तरुणीची ही प्रेरक कहाणी. विशाखा गौतम खरतड असे कर्तबगार मुलीचे नाव. औरंगाबादेतील एक्स्पर्ट ग्लोबल या आघाडीच्या साॅफ्टवेअर कंपनीत ग्रूप लीडर असलेली विशाखा विविध प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने देशविदेशात भ्रमंती करत असते.
बायजीपुऱ्यात गल्ली नं. 26 मध्ये राहणारी विशाखा अपाॅस्टाॅलिक शाळेत शिकली. वडील पाटबंधारे खात्यात होते. बारावीनंतर इंडो-जर्मन टूल रूमच्या अभ्यासक्रमाला विशाखाने प्रवेश घेतला. वडिलांचे 2002 मध्ये निधन झाले. कुटुंब अडचणीत सापडले. बहिणींनी शिकवण्या घेतल्या, भाऊ सुटीत कंपनीत काम करत असे. घराची जबाबदारी विशाखाने पेलली. बारावीनंतर पुढे प्रश्न होता. इंडो- जर्मन टूलरूमच्या डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाला मुली प्रवेश घेत नाहीत. पण परंपरा मोडून काढत तिने धाडस केले. चार वर्षाचा कोर्स पूर्ण करत तिने विशेष प्राविण्यांसह पदविका मिळवली.
पाच देशांची ग्लोबल भरारी
विमानही न पाहिलेल्या विशाखाला पाच देशांत जाऊन काम करण्याची संधी कंपनीने दिली. अचानक नेदरलँडला जाण्यास सांगण्यात आले तेव्हा तिच्याकडे पासपोर्टही नव्हता. धावपळ करून तो मिळवला आणि ती एकटीच परदेशात गेली. कंपनीने तिची संपूर्ण व्यवस्था केल्याचे तेथे उतरल्यावर तिला कळाले. टूलरुमचा डिप्लोमा केला असला तरी विशाखा अनुभवातून शिकत गेली. कॅडकॅमवर जगभरातील कंपन्यांना डिझाइन तयार करून देण्याचे देण्याचे अवघड काम सहजपणे करते. नेदरलॅन्डमधील सहा महिन्यांत तिने तेथील कंपनीला त्यांच्या गरजेनुसार लोडींग ट्रकचे थ्रिडी डिझाईन करून दिले.
स्वत:चा बंगला बांधला
जगभर भ्रमंती करतानाच विशाखाने धाकट्या दोन बहिणी व भावाचे शिक्षण केले. त्यांची लग्नेही करून दिली. सिडको एन २ भागात तिने स्वत:चा टूमदार बंगला बांधला. आईसोबत ती तेथे राहते. समाजासमोर मोठा आदर्श उभा करणाऱ्या विशाखाला मात्र आपण फार काही वेगळे केले आहे असे वाटत नाही. विदेशात मागणी असल्याने मुलींनी तांत्रिक शिक्षण घ्यावे असे मात्र ती अावर्जुन सांगते.
जिद्दीचे दुसरे नाव विशाखा!
केवळ जिद्दीवर विशाखाने अमेरिका, जर्मनी फ्रान्स नेदरलॅन्ड ,थायलॅन्ड सारखा देशांत एकट्याने जाऊन असाईनमेन्ट केल्या. विदेशातील एक कंपनी आमचा सर्वांत अवघड क्लायंट आहे, पण विशाखा ग्रूप लीडर असेल तर टीम पाठवा, असे ही कंपनी म्हणते. यातच सर्व काही आले. - मुकुंद कुलकर्णी, संचालक, एक्स्पर्ट ग्लोबल

पाॅलिसी एजंट ते ग्रुप लीडर प्रवास
सुरुवातीला नोकरी नव्हती.मग चिकलठाण्यात जाॅबवर्क सुरू केले. कामेही मिळायची. पण दगदग वाढली. तुलनेत पैसा मिळेना. मग पाॅलिसी एजंटचे काम केले. ग्लोबल एक्स्पर्टचे मॅनेजर श्याम पांडेंशी ओळख झाली. संचालक मुकुंद कुलकर्णी यांनी टॅलेंट पाहून विशाखाला संधी दिली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विदेशातील अनुभवांनी संपन्न केले