आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामच्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण, रात्री १.१८ च्या अंधाराकडून सकाळी ६.२३ पर्यंतचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सिग्मा हॉस्पिटलमध्ये चिंतेचेच वातावरण होते. कारण मुंबई येथून येणारे विमान रद्द झाले होते. मात्र, डॉ. उन्मेष टाकळकर शांत आणि निश्चयी होते. सव्वा वाजेच्या सुमारास त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले अन् एक वाजून १८ मिनिटांनी डॉक्टरांचे पथक ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचले. ब्रेनडेड झालेल्या २४ वर्षीय राम मगरच्या दोन्ही किडन्या, लिव्हर काढण्याचे काम सुरू झाले. शुक्रवारी सकाळी ६.२३ मिनिटांनी हे अवयव मुंबईकडे जाणाऱ्या विमानातून रवाना झाले. जग सोडून जातानाही तीन जणांचा जीव वाचवणाऱ्या रामचे पार्थिव ९.४७ वाजता घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले. तेथून ते त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजता रामला त्याच्या गावात साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
देऊळगाव मही येथील राम सुधाकर मगरचा १२ जानेवारी रोजी अपघातात ब्रेनडेड झाला. त्याचे हृदय, लिव्हर आणि किडन्या मुंबई चेन्नई येथील रुग्णांना प्रत्यारोपित करण्याचे सिग्मा हॉस्पिटलमध्ये १४ जानेवारी रोजी ठरले. खासगी विमान कंपन्यांशी झालेल्या बोलण्यानुसार गुरुवारी रात्री साडेबारा वाजता हे अवयव चेन्नई, मुंबईला रवाना होणार होते. मात्र, विमानांचे वेळापत्रक बिघडल्याने पूर्ण प्रक्रियाच लांबणीवर पडली होती; मात्र सर्व अडथळे दूर करत डॉ. टाकळकर त्यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबादेत इतिहास निर्माण केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा...कसा होता रामचा हा प्रवास...