आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधाकर डोईफोडे यांना मान्यवरांची र्शद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-ज्येष्ठ पत्रकार आणि रेल्वे प्रश्नांचे जाणकार सुधाकर डोईफोडे यांच्या निधनाने मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आवाज उठवणारा जाणकार हरपला, अशी शोक संवेदना विविध मान्यवरांनी व्यक्त केली.

रेल्वेचा जाणकार हरवला

देशातल्या रेल्वेची संपूर्ण माहिती असणारा जाणकार हरवला आहे. आम्ही दोघांनी रेल्वे प्रश्नावर सोबत काम केले. रेल्वे मार्गांबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. दमरेचा मध्य रेल्वेत समावेश करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. रेल्वेच्या प्रश्नावर सर्वाधिक अभ्यासपूर्ण मागणी मांडणारे, लिहिणार्‍या व्यक्तिमत्त्वाला मराठवाडा मुकला आहे, अशा शब्दांत मराठवाडा रेल्वे विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

सतत आवाज उठवला

रेल्वेच्या प्रश्नावर मराठवाड्याची एकत्रित भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व हरवले आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातूनदेखील त्यांनी सातत्याने रेल्वेच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला. रेल्वेच्या प्रश्नांबाबत ते थेट रेल्वे मंत्रालयापर्यंत जात होते. त्यांच्यामुळे अनेक नव्या रेल्वे सुरू होण्यास मदत झाली आहे. -अँड. प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद

रेल्वे प्रश्नांचा दुसरा जाणकार होणे नाही

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळायचे. आम्ही अनेकदा दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना भेटायचो. रेल्वेच्या बाबतीत त्यांच्याइतका दुसरा जाणकार नाही. चंद्रकांत खैरे, खासदार