आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या व्यवसायासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सीएचा(सनदी लेखापाल) टोल पास केल्याशिवाय तुमच्या ग्राहकाचा पैसा आमच्या तिजोरीत येत नाही. सीए म्हणजे सरकारचा आर्थिक आधार असतो. त्यामुळे मी नेहमीच सीए त्यांच्या व्यावसायिकांकडून जास्तीत जास्त कर तिजोरीत भरला जाईल यासाठी दररोज देवाकडे प्रार्थना करत असतो, अशी मिश्किल टिप्पणी करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीएच्या कामांचे कौतुक केले.
वेस्टर्न इंडिया रिजनल काैन्सिल ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेतर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी आयसीएआयच्या सभागृहात परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ सरकारी वकील उज्ज्वल निकम, आमदार अतुल सावे, संघटनेचे अध्यक्ष देवराजा रेड्डी, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे, विजयकुमार गुप्ता, उमेश शर्मा, अलकेश राका, मंगलेश किनरे, मधुकर हिरेगंगे, कमलेश साबू, प्रफुल्ल छाजेड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, रुग्णासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर देव असतो त्याचप्रमाणे व्यावसायिक, उद्योजकांसाठी सीए देवच असतो. करदात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची अाहे. त्यात सीए तेवढेच योगदान देत असतात. आयसीएआयसारख्या संघटनांनी सरकारचे आर्थिक धोरण तयार होतानाच सुधारणा सुचवल्या पाहिजेत. सीएकडे अनुभवाची शिदोरी असते. त्यामुळे तुमच्या सहकार्याने राज्याचा विकास आपण वेगाने पुढे नेऊ शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले. अॅड. निकम म्हणाले की, सीए समाजाचे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवत असतात. त्यांची भूमिका, त्यांचा पुरावा न्यायालयीन प्रक्रियेत ग्राह्य धरला जातो. त्यासाठी आपला व्यवसाय पारदर्शी प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे.

सीएंसंदर्भात अनेकदा घोटाळ्यांच्या बातम्या एेकायला मिळतात. वाईट प्रवृत्तीची माणसे सगळीकडेच असतात. परंतु त्यापलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रामाणिकपणा स्वच्छ आचरण ठेवले तर समाजात आपण आपला व्यवसाय वंदनीय ठरतो, असा सल्लाही त्यांनी दिला. रेड्डी म्हणाले की, समाज तुमच्याकडून काय अपेक्षित करतो, हे समजून तुमचे कार्य सुरू ठेवा. उत्पादन क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असताना सीएंना अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रोहन आचलिया, गणेश शीलवंत, सचिन लाठी, योगेश अग्रवाल, पंकज सोनी, रवींद्र शिंदे आदींची उपस्थिती होती.

पाऊस पडावा, दहा हजार कोटी वाचतील : जुलै रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देताना त्यांनी सीएंना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सीए म्हणजे पैशांचा संबंध येतो. पैसे कागदापासून तयार होतात आणि कागद झाडांपासून. दुष्काळ ओसरला तर व्यवसाय भरभराटीस येतील. गेल्या वर्षी पाऊस पडल्याने दहा हजार कोटी रुपये खर्च झाले. यंदा पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करत भविष्यात हा खर्च वाचवण्यासाठी वृक्षारोपणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

सीएंना पंचसूत्री
{मोहबाळगता स्वच्छ कारभार ठेवा
{ तुमच्या ग्राहकाचे भय बाळगू नका
{ कागदपत्रांमध्ये स्पष्टता ठेवा, गफलत करू नका
{ कुणाच्याही दबावाला बळी पडू नका
{ सरकारला माहिती देताना स्पष्ट, पारदर्शी खरी माहिती द्या.