आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugarcan Farmer Issue In Paithan, News In Marathi

पैठण तालुक्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांपुढे यंदाही संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठण तालुक्यात यंदा 6 हजारांहून अधिक हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. परंतु तालुक्यातील कारखाने यंदाही बंद राहण्याची भीती असल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
गेल्या वर्षी पैठण तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील ऊस संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे इतर कारखान्यात पाठवावा लागला.े या वर्षी धरणातून दोन्ही कालव्यात दोन वेळा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उसाची लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र यंदा संत एकनाथ व शरद सहकारी साखर कारखाना बंद स्थितीत आहे. त्यामुळे यंदा हा ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व शरद सहकारी साखर कारखाना हे दोन कारखाने आहेत. मागील वर्षाप्रमाणेच संत एकनाथच्या संचालक मंडळालाही या वर्षी कुणी कारखाना चालवायला घेताय का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे हा कारखाना चालवण्यास घेणार होते. मात्र त्यांच्या अपघाती निधनाने ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या तरी हा कारखाना कोणी चालवण्यास घेईल का यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. परंतु कोणीही तो चालवण्यास घेण्यास तयार नसल्याने तेही हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या वर्षी हा कारखाना बंद राहिल्यास त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या उसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. त्यातच इतर कारखाने या तालुक्यातील ऊस घेऊन जाण्यास इच्छुक दिसत नाहीत.

या वर्षी तरी तालुक्यातील कारखाने सुरू करा
>गेल्या वर्षी कारखाना सुरू झाला नसल्याने आम्ही ऊस इतर कारखान्याला घातला. मात्र मनस्ताप झाला. यंदा तरी हा कारखाना सुरू करावा.
- काका कणसे, शेतकरी
>संत एकनाथ सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहे. कारखाना यंदा सुरूहोईल.
- अ‍ॅड. कांताराव औटे, व्हा.चेअरमन, संत एकनाथ सहकारी कारखाना, पैठण