आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: ठिबकने उसाचे क्षेत्र तिपटीने वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- राज्य सरकारने उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर मराठवाड्यातील उसाचे क्षेत्र तिपटीने वाढेल, शिवाय जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्याच्या माध्यमातून जे सध्या सिंचनाला पाणी सोडले जाते त्यात सत्तर टक्क्यापर्यंत बचत होणे शक्य असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

तालुक्यात दरवर्षी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर उसाची लागवड सात हजार हेक्टरांवर होते. हेच उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले, तर सत्तर टक्के पाण्याची बचत होईल. मराठवाड्याला धरणाचा पाणीसाठा लक्षात घेता चार ते पाच पाणी पाळ्या सिंचनासाठी दिल्या जातात. हे मराठवाड्यातील क्षेत्र सिंचनाखाली आले, तर दोन पाणी पाळीत तेवढ्याच पाण्यावर शेतीच्या क्षेत्रात तिप्पट उसाची लागवड होऊ शकते, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.    जायकवाडी पाण्यावर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि नगर  जिल्ह्यातील शेती ओलिताखाली येते. यंदा सहा पाणी पाळ्या मराठवाड्यातील शेतीला दिल्या. पाण्याचा बेसुमार वापर झाला असला तरी उसाच्या क्षेत्रात विशेष वाढ झाली नाही. 

२ टक्के व्याजदराने मिळणार कर्ज
उसाचे जास्तच जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज दराने प्रति हेक्टरी ८५ हजार ४०० रुपये कर्ज सरकार उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

उसाचे क्षेत्र वाढेल  
जायकवाडीच्या पाण्यावर मराठवाड्यातील उसासाठीच जास्त पाण्याचा वापर होतो. ठिबकवर उसाची लागवड झाली तर निम्म्या पाण्याच्या बचतीबरोबर उसाचे क्षेत्र वाढण्यास ठिबक फायद्याची होईल.
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
बातम्या आणखी आहेत...