आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुत्रप्राप्तीसाठी छळ; औरंगाबादेत महिलेची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडको एन-5 मधील साने गुरुजी कॉलनीतील पल्लवी समाधान गोसावी (29) या विवाहितेने रविवारी (20 जानेवारी) रात्री साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी छळ केल्यामुळे तिने जीवनयात्रा संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

नऊ वर्षांपूर्वी पल्लवीचे समाधानशी लग्न झाले होते. मूल होत नसल्याने तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळीने त्यांचा छळ केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला अटक केली. दरम्यान, आत्महत्येनंतर घराजवळ शंभर ते दीडशे लोकांचा जमाव जमला होता. सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास पल्लवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर काही अंशी तणाव निवळला.

महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
सोमवारी (21 जानेवारी) सकाळी सिडको एन-5 भागातील प्लॉट क्रमांक 149 मधील रहिवासी होमिओपॅथी डॉक्टर ज्योत्स्ना दीपक पाठक (38) यांनी राहत्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, पती दीपकने दोरी तोडून त्यांना वाचवले. सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाच महिन्यांत 4 आत्महत्या
गेल्या पाच महिन्यांत सिडको एन-5 मध्ये चार महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद सिडको पोलिस ठाण्यात आहे. 8 सप्टेंबरला मयूरी राजू मोरे (21 ), 28 ऑक्टोबरला मीनल प्रशांत पाटील, 20 डिसेंबर रोजी निशा प्रकाश शहा (33), 20 जानेवारीला पल्लवी समाधान गोसावी यांनी आत्महत्या केली असून डॉ. ज्योत्स्ना पाठक (21) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.