आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन केल्याने एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - विषप्राशन केलेल्या एकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघांवर उपचार सुरू आहेत. देऊळगावराजा तालुक्यातील लक्कडकोट येथील सुभाष बालाजी कोणके(४५) यांनी रागाच्या भरात विष प्राशन केले. जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना घाटीत दाखल केले असता गुरुवारी (६ जुलै) पहाटे ते मरण पावले.
दुसऱ्या घटनेत आसेफिया कॉलनीतील इरफान मोहंमद(४०) या व्यक्तीने घरगुती कारणावरून गुरुवारी जुलैच्या पहाटे १२.३० च्या सुमारास विष प्राशन केले. अन्य एका घटनेत एस.टी.कॉलनी येथील रहिवासी सना
फिरदोस शेख अमीन(२२) या महिलेने बुधवारी जुलैच्या सायंकाळी घरगुती कारणावरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.