आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरह असह्य झाल्याने प्रियकराची औरंगाबादेत आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रेयसीचे लग्न झाल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या अंकुश गजानन वानखेडे (20) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जयभवानीनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. अंकुश डी.टी.एड. उत्तीर्ण होता. त्याचे वर्गमैत्रिणीवर प्रेम होते. मात्र पालकांनी जून महिन्यात तिचा विवाह इतरत्र करून दिला होता. त्यानंतर लग्नाच्या चौथ्याच दिवशी ती अंकुशसोबत शहरात आली होती. काही दिवस सोबत राहून ती पुन्हा परतली. प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने अंकुशने जीवनयात्रा संपवली. मुकुंदवाडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.