औरंगाबाद - दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या प्राध्यापकाने स्वत:च्या संसाराचे मातेरे केले. त्याच्या छळाला कंटाळून लिपिक असलेल्या पत्नीने आधी सहा वर्षांच्या चिमुकलीला विहिरीत ढकलून तिच्यापाठोपाठ स्वत:लाही झोकून दिले. सुदैवाने या चिमुरडीच्या हाती विहिरीतील लोखंडी पाइपला बांधलेली दोरी आल्याने ती बचावली. मात्र, तिला मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या आईच्या जीवनाची दोरी तुटली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे घडली. रसिका कालिदास फड (३२, रा. पृथ्वीनगर, सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर जिगीषा असे दैवाने तारलेल्या चिमुकलीचे नाव आहे. पोलिसांनी पती कालिदास फड याला अटक केली आहे.
रसिका या जलसंधारण विभागात लिपिक म्हणून काम करत होत्या, तर कालिदास हा करमाड येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. दोघेही उच्चशिक्षित असूनही रसिकावर आत्महत्येची पाळी यावी हे दुर्दैवच, अशी चर्चा या भागात होती. गुरुवारी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या प्रतीक्षाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही एका महिलेने आत्महत्या केल्याने लोकांत हळहळ व्यक्त होत आहे.
रसिका पती कालिदास, नणंद आणि सासूच्या छळाला कंटाळल्या होत्या. त्यांच्या जाचामुळेच शुक्रवारी पहाटे त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापल्या. नंतर त्यांनी सहा वर्षांची मुलगी जिगीषा हिला सोबत घेऊन घरासमोरील ग्रामपंचायतीची विहीर गाठली. प्रथम जिगीषाला विहिरीत ढकलून तिच्यापाठोपाठ स्वत: विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीत पडल्यानंतर जिगीषाच्या हाती लोखंडी पाइपला बांधलेली दोरी लागली आणि ती दोरीला घट्ट पकडून राहिली. मात्र, रसिका यांचा बुडून अंत झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... कायमभांडण आणि मारहाण... गायकवाड बनले देवदुत... अग्निशमन दलाने काय केले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)