आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला चिठ्ठी लिहून जीवनयात्रा संपवली, म्हणाला, तू नाराज होऊन जिवाला खाऊ नको!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आई, मी आत्महत्या करतोय. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही. मी स्वत: जीवन संपवत आहे. तू नाराज होऊन जिवाला खाऊ नकोस, अशी चिठ्ठी लिहून आईवडिलांना एकुलता एक असलेल्या १९ वर्षीय शशांकने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारा परिसरातील नारायणनगर येथील भगवानराव जोशी यांचा मुलगा शशांकने मंगळवारी रात्री पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स. भु. महाविद्यालयात तो वाणिज्य शाखेत शिकत होता. १२ वीत नापास झाल्याने त्याने पुरवणी परीक्षा दिली होती. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास त्याने चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिस निरीक्षक काकडे, उपनिरीक्षक डोईफोडे, सखाराम सानप आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरून शशांकने लिहिलेली दोन पानी चिठ्ठी हस्तगत केली. बुधवारी सायंकाळी शशांकवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देहदानाची इच्छा : माझ्याआत्महत्येस कुणीही जबाबदार नाही. आई, मी माझे जीवन संपवत आहे. तू नाराज होऊ नकोस. जिवाला खाऊ नकोस. हा निर्णय माझा आहे. या आधी मी माझ्या मित्रांना भेटलो आहे. माझ्या अंत्यसंस्काराला कोण कोण येतो, हे तुम्ही पाहालच. माझ्या आत्महत्येची बातमी वृत्तपत्रांना देऊ नका. अंत्यसंस्काराला किती जण येतात, हे बघा. जमल्यास माझे शरीर दान करा, असे चिठ्ठीत लिहिले होते.

नैराश्यातून आत्महत्या ?
चिठ्ठीतील आशयानुसार शशांकने नैराश्य आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो १२ वीत नापास झाल्याने त्याच्या वडिलांनी त्याला संगणकाशी संबंधित व्यवसाय स्थापन करून दिला होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात.
बातम्या आणखी आहेत...