आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेखाली उडी घेऊन दोघांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शुक्रवारी शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत ४२ वर्षीय विवाहिता आणि ३२ वर्षीय पुरुषाने रेल्वेगाडीखाली उडी घेऊन आयुष्य संपवले. लीना विलास पाटील (४२, रा. न्यू बालाजीनगर), दिनकर आसाराम गायकवाड (३२, रा. नॅशनल कॉलनी) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीना पाटील या शुक्रवारी सकाळी वाजता घराबाहेर पडल्या होत्या. दुपारी १२.३० च्या सुमारास सचखंड एक्स्प्रेसखाली त्यांनी उडी घेतली. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अॅम्बुलन्स बोलावून त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. लीना यांचे पती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई आहेत. त्यांचा एक मुलगा शुभम (१८) हा बारावीत शिक्षण घेत असून मुलगी सायली (२२) ही महाविद्यालयीन शिक्षण घेते.

...पणतोपर्यंत उशीर झाला लीनाविचार करत करतच रेल्वे रुळापर्यंत पाेहाेचल्या. काही लोकांना संशय आल्याने त्यांनी ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत त्यांनी गाडीखाली उडी घेतली.

कौटुंबिक कारणातून जीवन संपवले
दिनकर आसाराम गायकवाड यांनी दुपारी ३.४५ च्या सुमारास औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरखाली उडी घेऊन आयुष्य संपवले. गायकवाड यांचा पत्नीशी वाद झाला होता. वादानंतर त्यांनी रागाच्या भरात मी आत्महत्या करण्यासाठी जात अाहे, असे पत्नीला सांगितले होते. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दिनकर हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक होते.
बातम्या आणखी आहेत...