आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ तिघी मायलेकींचा अखेर मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलगा होत नसल्यामुळे सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून महालपिंप्री येथील २२ वर्षीय विवाहितेने शनिवारी दोन चिमुकल्या मुलींना विष पाजले आणि नंतर स्वत: विष घेतले. अत्यवस्थ असलेल्या तिघी मायलेकींचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विवाहितेच्या नातेवाइकांनी मात्र सासरच्यांनीच तिघींनाही विष पाजल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी नवऱ्यासह सासू, दीर जाऊ यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नीता संतोष भाेळे (२२), दीप्ती (२) दिव्या (४) अशी मृतांची नावे आहेत.
रामनगर परिसरातील प्रकाशनगर येथील गोपीनाथ मगर यांची मुलगी नीताचा संतोष गोविंद भोळे (२७, रा. महालपिंप्री) याच्यासोबत २०११ मध्ये विवाह झाला होता. नातेवाइकांनी सांगितल्यानुसार, नीताला लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने सासरची मंडळी तिला टोमणे मारत होती. अनेकदा मारहाणही करण्यात आली. छळामुळे ती माहेरी येत होती. शनिवारी पहाटे तिने दोन मुलींना विष पाजून स्वत:ही प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना घाटीत दाखल केले; परंतु रात्री एक वाजता दिव्याचा, दीप्तीचा पहाटे पाच, तर नीताचा सकाळी सात वाजता मृत्यू झाला. दरम्यान, नीताचे आईवडील घाटीत दाखल झाले. नीताच्या सासरच्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे शवगृहाबाहेर काही काळ तणाव होता.
भावाच्यालग्नालाही पाहुणीसारखी येऊन गेली : बहिणींसहभाचींचे मृतदेह पाहून निताचा लहान भाऊ ओक्साबोक्शी रडत होता. काही महिन्यांपूर्वी मोठ्या भावाचे लग्न झाले; परंतु लग्नाला जाण्यास सासरच्यांनी विरोध दर्शल्यामुळे ती भावाच्या लग्नात पाहुणीसारखी आली आणि सासरच्या मंडळींसोबत परत गेली. हा कटू प्रसंग तिच्या भावाने पोलिसांना सांगितला.
नीता बारावीपर्यंत शिकलेली होती. तिच्या आईवडिलांच्या तक्रारीनंतर पती संतोष, सासू वीणा भाेळे, दीर सतीश जाऊ आम्रपाली यांच्याविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मीना तुपे राहुल लोखंडे करत आहेत.

चेहऱ्यावर विष पसरल्याने संशय
नीताने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे; परंतु तिच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन, तर पोटावर चटके दिल्याचे व्रण आढळून आल्याने तिला बळजबरीने विष पाजल्याचा आरोप नातलगांनी केला.
बातम्या आणखी आहेत...