आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत उडी घेऊन गर्भवतीची अात्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नऊ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने सोमवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी तिचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नारेगाव परिसरातील मांडकी येथे ही घटना घडली. कांचन चंद्रकांत आहिरे असे मृत महिलेचे नाव आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असा आरोप माहेरच्या नातलगांनी केला आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी कांचन चंद्रकांत यांचा विवाह झाला होता. सोमवारी सकाळी ९.३० वाजता कांचन शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती, परंतु ११ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. यामुळे घरच्यांनी तिचा शोध घेतला असता ती गावाबाहेरील विहिरीत पडल्याचे कळाले. पती चंद्रकांत याने तत्काळ चिकलठाणा पोलिसांना ही माहिती दिली. कांचन नऊ महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचन बाळंतपणासाठी माहेरी आली होती, परंतु माहेरच्यांनी तिला दोनच दिवसांपूर्वी पुन्हा सासरी पाठवले होते. घटना कळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, परंतु अपुऱ्या साधनांमुळे अग्निशमन दलाला मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...