आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीयूच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या, वाळूजच्या हयात हॉस्पिटलमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रक्तदाब(ब्लड प्रेशर) कमी झाल्याने रुग्णालयात भरती केलेल्या कामगाराने दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारच्या मध्यरात्री बजाजनगरातील हयात हॉस्पिटलमध्ये घडली. बाबुल लंकेश्वर बोरो (३१, रा.बोरोला, जि.बक्सा, आसाम, ह.मु.शिवालय चौक, बजाजनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूजमधील एका कंपनीत चार वर्षांपासून बाबुल बोरो काम करीत होता. रक्तदाब कमी झाल्याने त्याला संतोषकुमार दुबे या मित्राने हयात हॉस्पिटलमध्ये दोन ऑगस्ट रोजी दाखल केले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू हाेते. सोबत कुणीही नातलग नव्हते. गुरुवारी बोरो आरडाओरड करून गोंधळ घालत होता. सलाइनच्या सुईचा हात दाखवून तो काहीतरी बडबडायचा. त्याची भाषा समजत नसल्याने डाॅक्टर परिचारिका त्याला गोळ्या तसेच इंजेक्शन देऊन झोपण्यास सांगायचे. थोडा वेळ झोपला की पुन्हा तो गोंधळ घालणे सुरू करायचा. मध्यरात्रीपर्यंत त्याची बडबड सुरू होती.

क्षणार्धात मारली उडी
गुरुवारी मध्यरात्री बोरो बिस्किटांचे पुडे कपडे असलेली पिशवी हातात घेऊन आयसीयू रूममध्ये इकडून तिकडे पळत सुटला. डॉक्टर परिचारिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता कात्री उचलून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करीत फरशीवर डोके आपटल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्यामुळे डॉक्टरही घाबरले. थोड्याच वेळाने ताे खिडकीची काच फोडून बाहेरून लावलेल्या एसीच्या बॉक्सवर जाऊन बसला लगेच खाली उडी घेतली. डॉ. हरीश छापरवाल यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. वाजून ४० मिनिटांनी पोलिसांनी बेशुद्ध बोरोला घाटीत नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस जमादार एकनाथ वारे पुढील तपास करीत आहेत.

चौकशी गरजेची : बोरोचामृत्यू संशयास्पद अाहे. आत्महत्या करायची होती, तर तो स्वत:चे कपडे बिस्किटे असलेली पिशवी सोबत कशाला घेईल? याचा अर्थ त्याला योग्य सुविधा उपचार मिळत नसल्याने घरी जायचे होते. मात्र, हॉस्पिटलकडून त्याला सुटी दिली जात नव्हती. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. असे डावात मचाळा पार्टीचे कार्याध्यक्ष भरत फुलारे यांनी सांगितले.

सुविधांचा हक्क कायम
सूत्रांच्या म्हणण्यानुसार नवा आराखडा नागरिकांना अधिक उपयुक्त ठरणार आहे. कारण पदाधिकाऱ्यांच्या आराखड्यात शाळा, क्रीडांगणे, वाचनालये, मोकळी मैदाने, उद्यानांसाठी अपेक्षित जागा कमी करून ती बिल्डर किंवा भूमाफियांसाठी निवासी केल्याचा आक्षेप होता. नव्या आराखड्यात अपेक्षित जागा मिळू शकेल. बिल्डर प्लाॅटिंगचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पाणीसाठे जलस्रोतांच्यामूळ संख्येत, आकारात फेरफार करण्यात आले होते. आता हे पाणीसाठे जलस्रोत वाचतील.

उपचार होत नसल्याने चिडला
आयसीयू रूममधील काही रुग्णांच्या नातलगांनी ‘दिव्य मराठी’ला नाव छापण्याच्या अटीवर सांगितले की, बाबुल बोरोला जास्त त्रास होत होता. मात्र त्याच्यावर उपचार केले जात नसल्याने तो चिडला होता. त्यामुळे त्याने डाॅक्टरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...