आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IG बंगल्याच्या आवारात सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या, आजाराला कंटाळून जीवन संपवत असल्याची चिठ्ठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत दयानंद - Divya Marathi
मृत दयानंद
औरंगाबाद- विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या (आयजी) बंगल्याच्या आवारात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दयानंद उत्तम उमप (३५, रा. बीड) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून तो बंगल्याच्या शेजारील क्वार्टरमध्येच राहत होता. वेदांतनगर पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

बाबा पेट्रोल पंपाजवळ आयजींचा बंगला असून सध्या अजित पाटील हे विशेष पोलिस महानिरीक्षक आहेत. बुधवारी सकाळी पोलिस शिपाई कृष्णा बरबडे हे बंगल्यावर ड्यूटीला आले असता त्यांना बंगल्याच्या शेजारील सफाई कामगाराच्या घराजवळून दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी जाऊन पाहणी केली असता घरात माशा घोंगावत असल्याचे दिसले. त्यांनी खिडकीच्या फटीतून बघितले असता दयानंदचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. वेदांतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्दिकी यांनी घटनास्थळ गाठले. दयानंदचा मृतदेह घाटीत हलवला. दयानंद याने छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतला. पंख्यांची उंची जास्त असल्यामुळे पिठाच्या डब्यावर दुसरा डब्बा ठेवून त्याने गळफास घेतला. 

दयानंद आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून दयानंद त्याची पत्नी दोन वर्षांपासून विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या बंगल्यात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करतात. २३ फेब्रुवारीपासून आयजी पाटील रजेवर आहेत. कुटुंबीयांसह ते कोल्हापूरला गेले आहेत.
 
२५ फेब्रुवारी रोजी दयानंद हा बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आला होता. बंगल्यातील काही कपडे धुण्यासाठी त्याने मेहुणीला आणले होते. काम झाल्यानंतर त्याने तिला घरी सोडले. या वेळी त्याला काही कर्मचाऱ्यांनी विचारले असता पत्नी आजारी असल्यामुळे ती मुलांसह माहेरी गेली आहे, तर मी बीडला चाललो असल्याचे सांगितले होते. दयानंदला एक लहान मुलगा आणि मुलगी आहे. त्याची सासूही पोलिस अधीक्षक कार्यालयात सफाई कामगार म्हणून उर्वरितपान.६ 

घडला प्रकार दुर्दैवी : पाटील 
घडलेलाप्रकार दुर्दैवी असून हळहळ वाटते. शहरात आल्यानंतर घटना जाणून घेईन. नियमानुसार योग्य ती कारवाई करत असल्याची कल्पना मला संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली, असे अजित पाटील यांनी फोनवर सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...