औरंगाबाद - विद्यापीठ परिसरातील बेरोजगार युवकाने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक बबनराव सोळुंके (19) असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याचा अपघातही झाला होता. दुचाकी चालवण्याचा छंद असताना त्याला अपंगत्व आले होते. त्यामुळे अशोक हताश झाला होता. त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. त्याचे वडील बबनराव सोळुंके हे विद्यापीठात चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत.
सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत आणण्यात आला. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक ए.ए.सय्यद यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.