आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांच्या याचिकेवरून 'सुखना'चे पाणी तपासणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतक-यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत सुखना नदीतील पाण्याच्या प्रत्येक किलोमीटरवरील नमुन्यांची तपासणी करावी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असा आदेश न्या. आर. एम. बोर्डे आणि पी. आर. बोरा यांनी सोमवारी दिला.
न्यायालयाने प्रधान सचिव पर्यावरण, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंंडळ, तहसीलदार, पोलिस निरीक्षक चिकलठाणा ग्रामीण, पोलिस निरीक्षक करमाड तसेच रॅडिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह सर्व संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

आत्माराम ठुबे व रामेश्वर वैष्णव या शेतक-यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी शेतीचे नुकसान झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.

प्रशासनाकडून कारवाई झाली नाही
याचिकाकर्त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. तहसीलदारांनी जागेवर पाहणी करून त्याचा प्रत्यक्ष पंचनामा केला होता. तरीही कारवाई झाली नसल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. आज सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले तर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.
बातम्या आणखी आहेत...