आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो काळजी करु नका ढोपरं-कोपरं फुटेपर्यंत खेळा, सुमित्रा महाजन यांनी दिला मंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन. - Divya Marathi
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन.
 औरंगाबाद - प्रत्येक वेळी मुलांच्या टक्केवारीचा विचार करून त्यांना केवळ गुणांच्या बेडीत अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांना भरपूर खेळू द्या, अगदी ढोपरं, कोपरं फुटली तरी चालेल. त्यांना जीवनातील अनुभव घेऊ द्या, असा सल्ला लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांना दिला. सरस्वती भुवनच्या शारदा मंदिर प्रशालेच्या शतक महोत्सवाच्या सांगता समारंभावेळी त्या बोलत होत्या. 
 
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स.भु. संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष जवाहरलाल गांधी, सरचिटणीस दिनेश वकील, सहचिटणीस श्रीरंग देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
काय म्हणाल्या सुमित्राताई..
- जयवंतीबेन मेहता या शाळेच्या विद्यार्थीनी होत्या त्यांची आज खूप आठवण झाली. 
- स्वातंत्र्य सैनिक ताराबाई लड्डा शाळेच्या विद्यार्थी म्हणून आल्या, त्यांना तर राष्ट्रपतींनी सन्मान पत्र दिले.
- मला आजही शाळेतल्या कविता आठवतात. पक्षीणी, फुलराणी या कविता मी आजही म्हणू शकते. पृथ्वीचं प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची कविता तर मला तोंडपाठ आहे. 
- मुलांना टक्के टोमणे खाऊ द्या, नाही तर टक्के कमावण्यातच आयुष्य जाईल. 
- आजकाल पॅकेजचीच भाषा शाळेपासून शिकवली जाते. माणुस बनायला शिका. साहित्य वाचा त्याने माणुस जीवंत राहण्यास मदत होते.
- मुलींनो अभ्यासाची फार काळजी करु नका भरपूर मैदानी खेळ खेळा, ड्रेसही मळू द्या, ढोपरं-कोपरं खेळतांना फुटू द्या.
- आज विद्यार्थी फक्त करिअर आणि करिअर मध्येच गुंतत चालला आहे. शिक्षक विद्यार्थांचे करिअर बिल्डींग करण्यातच गुंतलेला असतो. पण कॅरेक्टर बिल्डिंग महत्वाचे आहे.
- आजकाल घरांतील भिंतींवर आजी आजोबांचे फोटो दिसत नाही मुलांनो कुणाचे दिसतात? माधुरी दीक्षित? 
- पूर्वी फोटोंना महत्व होते. लहान मुले ते पाहून घराण्याचा इतिहास विचारत त्यामुळे माहिती व्हायची. 
- घरांतली चित्र बोलकी असात आपण कशी चित्र लावतो त्यावरुन संस्कार कळतात. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमाचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...