आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर विलासने झोपेतच वहिनी सुमित्रा होंडेवर झाडली गोळी , 11 पर्यंत कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना, अंबड : मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा यांचा खून दीर विलासने केल्याचे चौकशीत पुढे आले अाहे. सुमित्रा झोपेत असताना त्याने गोळी झाडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुरुवारी अंबड न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली अाहे. 
 
सोमवारी दुपारी वाजता घरी कुणीच नसल्याची संधी साधून विलासने झोपेत असलेल्या सुमित्राच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी घातली. शिवाय आवाज होऊ नये यासाठी थेट डोक्याला लावूनच रिव्हॉल्व्हर चालवले. यामुळे गोळीसुद्धा डोक्यातच अडकली. तसेच रिव्हॉल्व्हरवर हाताच्या बोटाचे ठसे उमटतील आपण पकडले जाऊ याचीही विलासने दक्षता घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारी ३.३० वाजता शाळेतून आलेल्या दीर कैलासला (आरोपी विलासचा छोटा भाऊ) ही घटना समजली. 
 
सर्वप्रथम अंबड त्यानंतर जालन्यात एका खासगी रुग्णालयात आणल्यावर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुमित्रा यांना मृत घोषित केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह औरंगाबाद घाटी रुग्णालयात नेऊन तेथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यावर दुपारी वाजता अंबड तालुक्यातील साडेगाव येथे अंत्यविधी करण्यात आला. 
 
घटना उघडकीस आल्यापासून ते अंत्यविधीपर्यंत आणि त्यानंतरच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर होती. खुद्द आयजी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या होत्या. यानुसार एसपी ज्योतिप्रिया सिंह, एएसपी राहुल माकणीकर, डीवायएसपी रमेश साेनुने, पीआय रामेश्वर खणाळ यांच्यासह एलसीबी, एडीएस, विशेष पथकाकडून अंबड शहर परिसरातील घडामोडींचा आढावा घेतला जात होता. 
 
१५ तास जबाब नोंदवले : गोपनीयमाहिती पूर्वानुभवाच्या आधारे सुमित्रा यांचा खून कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आला होता. यामुळे मंगळवारी अंत्यविधी बुधवारी सकाळी सावडण्याचा कार्यक्रम होताच पोलिसांनी ११ वाजता कुटुंबीयांनाच अंबड पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. यात पती सतीश होंडे, दीर डॉ. भरत तसेच चुलत दीर कैलास विलास यांना एकमेकांपासून काही अंतरावर ठेवून प्रत्येकाचे स्वतंत्र जबाब नोंदवले, तर सायंकाळी वाजेदरम्यान साई सेवा क्रिटिकल हॉस्पिटलचे डॉ. अभय जाधव यांचाही जबाब नोंदवला. 
 
सर्वप्रथम सुमित्रा यांना उपचारासाठी डॉ. जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांचा जबाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुधवारी सकाळी ११ ते गुरुवारी पहाटे वाजेपर्यंत जबाब सुरूच होते. मात्र, चौकशीत निष्पन्न झालेल्या विलासला पोलिसांनी १२.३० वाजता अटक करून घेतली त्याच्या नातेवाइकांनासुद्धा माहिती दिली. दरम्यान, ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली ते रिव्हॉल्व्हर काडतूस तपासणीसाठी मुंबईत बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे पाठवले जाणार आहे. 
 
सभापतींची फक्त चौकशी, ताब्यात घेतलेच नाही 
याप्रकरणात बुधवारी सकाळी ११ वाजता सभापती सतीश होंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना चौकशीसाठी अंबड पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. कुणालाही ताब्यात घेतले नव्हते. मात्र, चौकशीअंती विलास यास रात्री उशिरा अटक केली. दरम्यान, काही दैनिकांनी (दिव्य मराठी नव्हे) सभापती सतीश होंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. 
 
मात्र तपास अधिकारी उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने यांनी याचा इन्कार केला. सोबतच चौकशी दोन- तीन दिवससुद्धा सुरू राहू शकते. जोपर्यंत आरोपीस अटक केली जात नाही, तोपर्यंत त्यास ताब्यात घेतले असेही म्हणता येत नाही, असेही सोनुने यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 
 
विलास येथे अडकला 
कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवल्यानंतर विलासच्या जबाबासंदर्भात पोलिसांना शंका आली. सोमवारी दुपारी ते वाजेदरम्यान कुठे होता, याचे उत्तर विलासला देता आले नाही. वारंवार विचारणा करूनही तो काहीच बोलत नव्हता, मात्र, चेहऱ्यावर त्याच्या भीती जाणवत होती. पाेलिसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न करताच विलासने कबुली दिली. दरम्यान, आरोपीस अटक केल्याचे एसपी ज्योतिप्रिया सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...