आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात राहू देण्यासाठी सोयगाव तालुक्यात पित्याचा कु-हाडीचे घाव घालून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव - घरात का राहू देत नाही? असे म्हणत मुलाने पित्याच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मुखेड (ता. सोयगाव) येथे घडली. फरार मुलास पोलिसांनी तितूर-गोंदेगाव रस्त्यावर पहाटे शेतातून अटक केली.
श्रीराम झगा नाईक (55) यांचे मुलगा गुलाबशी रात्री भांडण झाले. त्याचा राग मनात धरून गुलाबने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या पित्याच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घातले. त्यातच श्रीराम यांचा मृत्यू झाला. नंतर तो पसार झाला. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद गाडे, फौजदार बळवंत जमादार यांच्यासह पोलिस पथकाने त्याच मध्यरात्री तितूर-गोंदेगाव रस्त्यावर सापळा रचून आरोपी गुलाबला एका शेतातून पहाटे चार वाजेच्या सुमारास अटक केली.