आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunday Special Khuldabad 2500 Students Face Competitive Exam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संडे स्पेशल: विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - शाळा-महािवद्यालयातअसताना िवद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड लागावी, यासाठी खुलताबाद तहसील कायार्लयाने तालुक्यातील तीन हजार मुला-मुलींची शनिवारी स्पर्धा परीक्षा घेतली. खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या अगळ्यावेगळ्या उपक्रमाचे िशक्षकांनी स्वागत केले.
तालुक्यातील ग्रामीण भागातील िवद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आकर्षण वाढावे, या उद्दशाने या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. खुलताबाद तालुक्यातील ३३ शाळा, महाविद्यालयाच्या वी ते १२वी इयत्तेतील िवद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यासाठी राज्य सेवेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. दीडशे गुणांसाठी ७५ प्रश्न ठेवण्यात आले होते.
यासाठी तासाचा कालावधी देण्यात आला होता. तालुक्यातील बाजारसावंगी, वेरूळ, गल्लेबोरगाव, टाकळी, भडजी, गदाना, सुलतानपूर, बोडखा, ितसगाव, वडोद कानोबा, खांडी िपंपळगाव, घोडेगाव, िपंपरी, पळसवाडी, िखर्डी, कसाबखेडा, शूलिभंजनसह खुलताबाद शहरातील शाळांमधील हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा िदली.
परीक्षेसाठी दुपारी १२ ते ही वेळ देण्यात होती. परीक्षा संपल्यानंतर संबंधित शाळेतील िशक्षकांनी पेपर तपासून आलेला िनकाल तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याकडे सोपवला. तहसीलदार उत्तरपत्रिका तपासून पुन्हा त्या विद्यार्थ्यांना परत करणार आहेत. परीक्षेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना तहसीलदारांकडून प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
या प्रश्नपत्रिकेत िदलेल्या प्रश्नांपैकी बरेचसे प्रश्न औरंगाबाद िजल्ह्यातील ऐितहासिक मुद्द्यांवर आधारित तर अन्य प्रश्न राष्ट्र तसेच राज्यस्तरावरील बहुचर्चित िवषयांवर आधारित होते. काही ठिकाणच्या वी ते वीच्या िवद्यार्थ्यांनीदेखील ही प्रश्नपत्रिका सोडवण्याची इच्छा व्यक्त केली. घृष्णेश्वर िवद्यालयातील इयत्ता वी ते वीचे िवद्यार्थी ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत. खुलताबादचे तलाठी एन.बी. कुसनुरे यांनी ही प्रश्नपत्रिका स्वत: तयार केलेली आहे. संत जनार्दन स्वामी िवद्यालय वेरूळचे प्राचार्य एम. बी. गवळी यांच्या मते आजपर्यंत कोणीही ग्रामीण भागातील िवद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबवलेला नव्हता. तहसीलदारांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे िवद्यार्थ्यांना नवीन काहीतरी िशकायला िमळाले आहे.

विद्यार्थी, शिक्षकांचा उपक्रमास प्रतिसाद
शालेयस्तरावरच िवद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड िनर्माण व्हावी यातून चांगले अिधकारी तयार व्हावेत, या हेतूने खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पुढाकार घेतला. इयत्ता ते १२ पर्यंतच्या िवद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील परिचयाच्या िवषयावर ७५ गुणांची परीक्षा घेतली. िवद्यार्थी िशक्षकांनाही याला चांगला प्रतिसाद िदला उपक्रमाचे कौतुक केले.