आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Hit Basari Vadak Hariprasad Chaurasiya In Aurangabad

हरिप्रसाद म्हणतात, ‘रंग बरसे भीगे..’ हे माइलस्टोन गीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अमिताभ बच्चन यांनी गायलेले ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे’ हे सिनेसृष्टीतील माइलस्टोन गीत आहे. मी आणि पं. शिवकुमार शर्मांनी मिळून हे गीत केले. आता मात्र असे चित्रपट निर्माण होत नाहीत, अशी खंत प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली. शारंगदेव महोत्सवाच्या निमित्ताने ते शहरात आले असताना ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.

पंडितजी म्हणाले, काळानुसार चित्रपट संगीतात बरेच बदल झाले. प्रेक्षकांच्या आवडीनुसार संगीत बदलत गेले. अभिजात शास्त्रीय संगीत हे रसिकांच्या आवडीप्रमाणे बदलणारे नसून त्याचे माधुर्य इतक्या अवीट गोडीचे आहे की एकदा हे वेड लागले की व्यक्ती त्याच्या वलयाबाहेर जाऊच शकत नाही.

सिलसिला, लम्हे, चांदनी, साहेबां, फासले अशा विविध चित्रपटांना आम्ही संगीत दिले. आता त्या पद्धतीची चित्रपट निर्मिती होत नाही. पर्यायाने शास्त्रीय संगीताची गरजही संपली आहे. आगामी काळात त्या दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती होणार असेल तर संगीत द्यायला मी उत्सुक आहे. मुगल-ए-आझम, पाकिजा आदी चित्रपटांचे संगीत अद्वितीय होते म्हणून आजच्या पिढीला ते भावते.

सर्मपण हवे म्हणून : एकलव्याने धनुर्विद्या शिकण्यासाठी पुतळ्याला गुरू केले आणि वेळ आली तेव्हा गुरुदक्षिणेत अंगठा कापून दिला. धनुर्विद्या शिकण्यासाठीचे त्याचे सर्मपण असाधारण होते. तेवढे सर्मपण असल्यास बासरी शिकता येईल, असा मुद्दा पुढे आल्याने मेहर घराण्याच्या उस्तादांची मुलगी अन्नपूर्णा देवी यांनी बासरी शिकवावी म्हणून मी उजव्या हाताची सर्व कामे डाव्या हाताने करीन असे म्हणालो. मी ते करून दाखवलेही. त्यामुळे त्यांनी मला बासरी शिकवण्यास होकार दिला.

अमिताभला दैवी देण : अमिताभ आणि मी दोघेही अलाहाबादचे. त्यांना ईश्वराने दैवी देण देऊन पृथ्वीवर पाठवले आहे. माझ्या एका लघुपटासाठी त्यांनी आवाज दिला आहे. अनेक वर्षांपासून आमचे प्रेमाचे संबंध आहेत. अनेक कामे आम्ही एकत्र केली आहेत. ते खूप महान व्यक्ती आहेत.

तरुण पिढीचा ओढा शास्त्रीय संगीताकडे
हल्ली अनेक कार्यक्रमांतून उच्चशिक्षित तरुण पिढी र्शोत्यांतून दिसून येते. हे पाहून आनंद होतो. यातून शास्त्रीय संगीताची ताकद कळून येते. यामध्ये असलेल्या प्रचंड ताकदीमुळे फ्यूजन संगीताच्या काळातही शास्त्रीयच्या मैफलीला तरुणाई गर्दी करते. शास्त्रीय संगीत हे ईश्वरीय संगीत आहे. यात अध्यात्म वसलेले असल्याने प्रत्येकाला ती खेचून आणते.

पालकांचा भर पैसे कमवण्यावर
नवी पिढी संगीत शिकण्यासाठी येत नाही. कारण हल्ली पैशांचे गणित सर्वांना समजले आहे. शिक्षण घेऊन मुलांना डॉक्टर, इंजिनिअर केल्यास अधिक पैसा मिळतो. त्यामुळे कलेकडे दुर्लक्ष होत आहे. पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन कलाभ्यास कसा शक्य आहे? कलेसाठी आयुष्य सर्मपित करावे लागते.

संगीत माधुर्य
>काळानुसार चित्रपट संगीतात बरेच बदल होत असल्याचे मांडले मत; आगामी काळात उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती झाल्यास संगीत देण्यास तयार
>फ्यूजनच्या काळातही शास्त्रीय संगीत अमर असल्याचा दावा

तरुण पिढीचा ओढा शास्त्रीय संगीताकडे
हल्ली अनेक कार्यक्रमांतून उच्चशिक्षित तरुण पिढी र्शोत्यांतून दिसून येते. हे पाहून आनंद होतो. यातून शास्त्रीय संगीताची ताकद कळून येते. यामध्ये असलेल्या प्रचंड ताकदीमुळे फ्यूजन संगीताच्या काळातही शास्त्रीयच्या मैफलीला तरुणाई गर्दी करते. शास्त्रीय संगीत हे ईश्वरीय संगीत आहे. यात अध्यात्म वसलेले असल्याने प्रत्येकाला ती खेचून आणते.

पालकांचा भर पैसे कमवण्यावर
नवी पिढी संगीत शिकण्यासाठी येत नाही. कारण हल्ली पैशांचे गणित सर्वांना समजले आहे. शिक्षण घेऊन मुलांना डॉक्टर, इंजिनिअर केल्यास अधिक पैसा मिळतो. त्यामुळे कलेकडे दुर्लक्ष होत आहे. पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन कलाभ्यास कसा शक्य आहे? कलेसाठी आयुष्य सर्मपित करावे लागते.

संगीत माधुर्य

काळानुसार चित्रपट संगीतात बरेच बदल होत असल्याचे मांडले मत; आगामी काळात उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती झाल्यास संगीत देण्यास तयार

फ्यूजनच्या काळातही शास्त्रीय संगीत अमर असल्याचा दावा