आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Power Fraud Deepak Parkhe Arrest In Aurangabad

बारबालांनी काढली पारखेची ‘सुपर पॉवर’, पोलिस तपासात उलगडल्या सुरस कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -‘केबीसी’ घोटाळ्यानंतर सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सूत्रधार दीपक पारखे आणि त्याची पत्नी दिव्या यांनी गुंतवणूकदारांची 80 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे प्रकरण औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले. पोलिस तपासात पारखेच्याअनेक सुरस कथा उलगडत आहेत, तर दुसरीकडे पारखेविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडत आहे.
पडेगावच्या नंदा पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पारखे दांपत्याचा शोध सुरू केला. अल्पावधीतच कोट्यवधींची रक्कम हाती पडलेल्या पारखेसाठी विविध ‘लेडीज बार’ हे जणू कार्यालयच बनले होते. यानंतर औरंगाबादच्या पोलिसांनी कल्याणमधील बारमध्ये वेशांतर करून त्याचा शोध घेतला. अखेर पारखे त्याच्या नेहमीच्या ढाब्यावर जेवण करताना हाती लागला.
पोलिसांची गाडी वळली मुंबईकडे
पोलिसांनी सुरुवातीला पारखे दांपत्याचा पुणे येथे तीन दिवस शोध घेतला. मात्र, काहीच हाती लागत नसल्याने परत औरंगाबादची वाट धरली. नगर मार्गावर असतानाच खबर्‍याचा फोन आला आणि पोलिसांची गाडी मुंबईकडे वळली.

भिवंडीतील चार बारमध्ये ये-जा
पारखे भिवंडीतील बारमध्ये नेहमी येत होता. पोलिसांनी प्रत्येक लेडीज बारमध्ये शोध घेतला. टिपिकल टपोरी स्टाइलमध्ये बारमधील तरुणींशी पोलिसांनी मैत्री करत पारखेची माहिती मिळवली. तो पसंतीच्या चार बारमध्ये नेहमी येत होता. चारही बारमध्ये वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली.

छायाचित्र - पारखेच्या घरी सापडलेले सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिस.

पुढील स्लाइडमध्ये, अशी झाली अटक