आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुपर स्पेशालिटी’अभावी माजी सैनिकांचे हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माजी सैनिकांसाठी केंद्र सरकारतर्फे आरोग्य योजना राबवण्यात येते. मात्र, औरंगाबाद विभागासाठी योग्य सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची निवड न केल्यामुळे माजी सैनिकांना जिवंतपणीच यातना सहन कराव्या आहेत. धूत व कमलनयन बजाज या रुग्णालयांशी औरंगाबादच्या स्टेशन कमांडंटनी कराराचे नूतनीकरण न केल्याने माजी सैनिकांचे हाल सुरू आहेत. निवृत्तीनंतर माजी सैनिकांना व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांना सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असताना त्यांनी ‘माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना’(ईसीएचएस) घोषित केली होती.
योजना का बंद ?
* रुग्णाचे बिल अत्यंत उशिरा मिळत असल्याची रुग्णालयांची तक्रार
* ईसीएचएस रुग्णालय आवश्यकता असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी उपचारासाठी शिफारस करते
* रुग्णावरील उपचार संपेपर्यंत रक्कम मिळत नाही
* सुपर स्पेशालिटी रुग्णालय बिल स्थानिक ईसीएचएस रुग्णालयाकडे पाठवते. पुण्यातून मंजुरीनंतर ते पुन्हा ईसीएचएस रुग्णालयाकडे पाठवले जाते. नंतर बिलाचा धनादेश काढला जातो.
* बिलाची रक्कम मिळण्यासाठी कागदपत्रांची मोठी यादी सादर करावी लागते. तरीही वेळेत रक्कम मिळत नाही. कमलनयन बजाज रुग्णालयाची सहा लाख रुपयांची रक्कम अद्याप मिळालेली नाही.’’ - डॉ. नीरज उत्तमणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कमलनयन बजाज.
* धूत रुग्णालय योजनेसाठी सर्वसाधारण वॉर्ड उपलब्ध करून देऊ शकत नाही. डिलक्स रूमचे दर जास्त असल्याने योजनेच्या दरात मोठी तफावत येते. जिल्हाधिकार्‍यांशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. - सुनील अवस्थी, प्रशासकीय अधिकारी, धूत रुग्णालय.
* जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून स्टेशन कमांडंट यांच्याशी योजनेसंदर्भात त्रैमासिक बैठकीत चर्चा केली. सामाजिक काम म्हणून रुग्णालयांनी विचार करावा व ईसीएचएस विभागानेही बिलिंग पद्धतीत सुधारणा करावी. - मेजर चंद्रसेन कुलथे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद.
* शहरातील पटवर्धन, जिल्ला, एकनाथ, एमजीएम व नेमीचंद रुग्णालयांशी संलग्नता केली आहे. रुग्णालय ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार स्टेशन कमांडंटचा आहे. - कर्नल ललित मदन, ईसीएचएस रुग्णालय, औरंगाबाद.