आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेचा विळखा: जातव्यात स्वयंघोषित बाबाने चमत्कार दाखवलाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री)- तुम्हाला किडनी प्रॉब्लेम असो किंवा मूल होत नसेल तर अशा कोणत्याही समस्यांवर उपाय करणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील एका बाबाकडे रोज सकाळी औरंगाबादसह, जालना, नाशिक, बुलढाणा, जळगाव, बीड आदी परिसरातून हजारो लोक रांगा लावून येतात. सुमारे महिनाभरापासून सुरू असलेल्या या गर्दीची चर्चा परिसरात सुरू होती.

आमच्या प्रतिनिधीने थेट घटनास्थळावर भेट देऊन चौकशी केली असता बाबाने उलटसुलट उडवाउडवीची उत्तरे देऊन भाविकांचा आश्रय घेत स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु अनेकांच्या चेहऱ्यावर या घटनेमुळे गांभीर्याचे भाव होते. भोळ्या भाविकांच्या दु:खाचे निवारण होईल या आशेने येथे रोज हजारांेच्या संख्येने गर्दी करणारे भाविक अंनिससाठी आवाहन ठरत आहे.
औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील आळंदपासून अंधारी मार्गावर जातवा हे गाव असून त्याच्या शेजारी बाबाचे हे उद्योग सुरू होते. जातवा येथील मूळ रहिवासी असलेले अशोक नथू पवार (५०) साधी राहणी असलेला हा महाराज मी शिवस्वरूप असल्याचा दावा करत आहे. एक कप पाण्यातून दिलेल्या औषधीमुळे मूतखडा,मूळव्याध,अॅपेंडिक्स,कॅन्सर,किडनी,पाेटदुखी या व्याधींचा समूळ नाश करतो तसेच चमत्कार करत बाबाने निपुत्रिक, अपंग मुक्यांनाही बोलते केल्याचा दावा करतो. परंतु प्रत्यक्षात रांगेत असलेल्या एकाही रुग्ण- भाविकांना गुण आढळला नसल्याचे चौकशीनंतर समोर आले. येणारे भाविक बाबा समोर असलेल्या एका फोटोसमोर इच्छेने १००- २०० ते १००० रुपये टाकावे लागतात. फोटोसमोर नोटांचा ढिगार होता.

बाबांच्या घरात पाण्याने अर्धी भरलेली बिसलरी फेस येणारे द्रव्य आढळून आले. मात्र या खोलीकडे कोणीही फिरकू नये असा बाबांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न दिसून आला. मी निपुत्रिकांना विडा देतो असे सांगत विडा बनवण्यासाठी बाबा एका खोलीत गेले परंतु खोलीत इतरांना प्रवेश नाही. हे सर्व गुपित राहावे अशीच बाबांची इच्छा दिसून आली.

प्रतिनिधीने काही प्रश्न विचारताच बाबाने आपला दरबार थांबवला आता आपल्याला येथेच थांबण्याचे आदेश शिवशंकराने दिले आहेत. असे सांगून मी या पाण्याचे दूध करून दाखवतो असे सांगत मंत्र फुकले परंतु पाण्याचे दूध झाले नाही. हा प्रकार प्रतिनिधीने जमलेल्या हजारो भक्तांना दाखवताच बाबा खवळले थेट गर्दीत जाऊन हे लोक त्रास देतात मी औषध देणार नाही, असे सांगत अारडाओरडा सुरू केला. हा सर्वप्रकार पाहून भाविकांसह बाबांचे सहकारी गोंधळले काय करावे सुचेना. बाबाने सहकाऱ्याने गर्दीतून काढता पाय घेतला.

याप्रकरणी गावात चौकशी केली असता काही ग्रामस्थांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले की बाबाचे सहकारीच गर्दीत जाऊन माझा मुलगा मुका होता तो बाबांच्या औषधीने बोलू लागला अशा अफवा पसरवून लोकांना जाळ्यात ओढत आहेत असे सांगितले. हा सर्वप्रकार सामान्यांच्या भावनांशी खेळण्याचा असून अशा गोष्टींना आळा बसावा यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे गावातील जुन्या जाणत्या लोकांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी अंनिसने बाबांच्या औषधी चमत्कार तपासून पाहावे, अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे. दररोज परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून हजारो दुचाकी चारचाकी वाहनांची मार्गावर गर्दीही वाढलेली होती. अशा प्रकारे गावात अणखी दोन लोकांनी बुवाबाजी करत औषधी देण्याचे प्रकार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

अंधश्रद्धा नसावी
मंत्रतंत्र पाणी भारून मुल होत नाही. विज्ञान युगामध्ये समाजाला हे माहित असायला हवे. श्रद्धा जरूर असावी अंधश्रद्धा नसावी.
-शहाजी भोसले, राज्य सरचिटणीस, अंनिस

लोकांची दिशाभूल
ही सर्वअंधश्रद्धा असून भोळ्या लोकांची दिशाभूल आहे. यावर माझा विश्वास नाही. पत्नीच्या अाग्रहाखातर मी येथे आलो.
- साईनाथ भुमे, आडगाव भुमे

कारवाई करणार
सदरील प्रकाराबाबत माझ्याकडे गोपनीय शाखेकडे कुठलीच माहिती नाही चौकशी करून कारवाई करण्यात येईल. - नरहरी शिंदे, सपोनि, वडोदबाजार

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाला भोंदू बाबा...