आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णाच्या पायावर भल्या भल्या ‘शहाण्यां’चे लोटांगण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ही कहाणी आहे बिसलेरी बाबा म्हणून परिचित असलेल्या व्यक्तीची. अंधश्रद्धेचा उत्तम नमुना असलेली ही माहिती मिळाल्यानंतर डीबी स्टार चमूने मागील पंधरा दिवस त्या बाबाचे निरीक्षण केले. मानसोपचारतज्ज्ञांना सोबत घेऊन त्याची प्राथमिक तपासणीही केली. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते तो मनोरुग्ण आहे. चमूने त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यातून एक महिला भेटली. तिने तो बाबा आपला भाऊ असल्याचा दावा केला आहे. तिच्या सांगण्यानुसार त्याचे नाव सय्यद शाकेर सय्यद मकसूद असे आहे. तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. लॅब टेक्निशियन म्हणून त्याने काही दिवस हैदराबाद दोन वर्षे सौदी अरेबियामध्ये काम केले. त्यानंतर त्याचे एका शिक्षिकेशी लग्न झाले. लग्नानंतर वर्षभरातच त्याचे पत्नीशी जमेना. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. याचा त्याच्या मनावर मोठा आघात झाला. आई-वडील वारलेले होते. सर्व भाऊ आणि बहिणींची लग्ने झालेली होती. भावांनी त्याचा सांभाळ केला नाही. तो औरंगाबादमध्ये बहिणीकडे आला. काही दिवसांनी मानसिकता अाणखीच बिघडली अन् तो रस्त्यावरच राहू लागला. सुरुवातीचे काही दिवस जुना बाजारमधील रस्त्यावर बसला. आता गेल्या आठ वर्षांपासून तो मनापाशेजारी बसलेला असतो.
भडकल गेटकडून मनपाकडे जाणाऱ्या चौकात तो केव्हाही पाहायला मिळेल. डोक्यावर गोणपाटाचा तळट, समोर पाण्याच्या दहा-बारा बाटल्या, द्रोण, डब्यांमध्ये बिर्याणी, चहा, बिस्किट, पोळी-भाजी, कोल्ड्रिंक्स असे पदार्थ कायम असतात. केस एवढे वाढलेले की तो बसलेला असल्यास जमिनीवर लोळतात. दाढीही तशीच वाढलेली. अंगात मळकट कपडे, पाय अनवाणी. कधी बोलणे नाही. फक्त समोर कुणी आले तर हवेत हातवारे करतो. असा हा बिसलेरी बाबा.
हा बाबा भाऊ असल्याचा दावा करणारी हीच ती महिला होय.

हात लावाल तर खबरदार!
या बाबाचे हाल पाहून सहा महिन्यांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने त्याच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, ही बाब जेव्हा त्या बाबाच्या अंधश्रद्ध भक्तांना कळली, तेव्हा त्यांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दम भरला. त्या बाबाला हात लावाल तर खबरदार, अशा शब्दांत त्यांना पुनर्वसन करण्यापासून रोखले.

देव मानणे म्हणजे अंधश्रद्धा होय
काही कारणांमुळे मनावर परिणाम झालेल्या अशा माणसाला दैवी अवतार मानणे म्हणजे अंधश्रद्धाच होय. त्यापेक्षा त्याच्या पुनर्वसनासाठी लोकांनी पुढे यावे. त्याला नवे जीवन देऊन एक प्रकारचे समाजकार्य करण्यासाठी मदत करावी. डॉ.सुनीलपगडे, जीवनजागृती सामाजिक वैद्यकीय संस्था

वेडे कोण, हेच कळत नाही
मनोरुग्णांचा फायदा घेणारे अनेक लाेक आहेत. स्वार्थासाठी एखाद्याला दैवी रूप देणे, हादेखील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुुसार गुन्हा आहे. बिसलेरी बाबाची कहाणी ऐकून खूप आश्चर्य वाटले. त्याच्या पुनर्वसनासाठी सजग नागरिकांनी मदत करावी. -शहाजी भोसले, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दैवी अवतार नव्हे, तो तर मनोरुग्ण...
या बाबाकडे भले-भले लोक येतात. आम्ही ते पाहिले आहे. पण तो बाबा मनोरुग्ण आहे. त्याचा गैरफायदा काही जण घेत आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही त्याच्या पुनर्वसनास तयार आहोत. समाजाने त्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. -डॉ.फारुक पटेल, जीवनजागृती
सामाजिक वैद्यकीय संस्था
ही तर पूर्णपणे अंधश्रद्धाच
हीअंधश्रद्धाआहे. कमजोर मनाचे लोक त्याच्याकडे जातात. रात्री व्हीआयपी गाड्यांमधून त्याच्याकडे लोक येतात. त्याच्या पुनर्वसनासाठी मी स्वत: काहींना कामाला लावले आहे. याशिवाय जर कुणी पुनर्वसनासाठी पुढाकार घेणार असेल तर मी व्यक्तिश: मदत करेन. -इम्तियाज जलील, आमदार

उपचार बाजूला, स्वार्थी लोकांची हजेरी
खरेतर या बाबावर मानसोपचार करून तो बरा कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असताना त्याच्या मनोविकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्व धर्मांतील मोठमोठे लोक या बाबाकडे हजेरी लावतात. काहीतरी गाऱ्हाणे घेऊन, मागणी घेऊन ही मंडळी अालेली असते. अगदी अन्य जिल्ह्यांमधूनही या बाबाकडे लाेक येतात. परीक्षेच्या काळात विद्यार्थी तर अक्षरश: रांग लावतात. काहींना तर महानगरपालिकेतील पदेही या बाबाच्याच अाशीर्वादाने मिळाल्याचे ते खासगीत सांगतात. यात सर्व धर्मीयांचा समावेश आहे. या बाबावर जर उपचार झाले तर तोही सामान्य चांगले आयुष्य जगू शकेल.

हेच नाव कसे पडले?
हा बाबा म्हणजे दैवी अवतार असल्याचा गैरसमज काहींनी करून घेतला. त्याच्यासमोर संध्याकाळी पाण्याची बाटली ठेवायची. सकाळी ती घेऊन जायची ते पाणी रुग्णांना पाजण्याचे, मुलांना पाजण्याचे, व्यवसाय असेल तर दुकानामध्ये शिंपडण्याचे गैरप्रकार सुरू झाले. यासाठी त्या बाबासमोर कायम पाण्याच्या बाटल्या मांडलेल्या असतात. यातूनच त्याचे नाव बिसलेरी बाबा पडल्याचे त्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी डीबी स्टार चमूला सांगितले.


अंधश्रद्धा: बाबाकायम बसून असतो.
वास्तव: हेखोटे आहे. तो झोपलेलाही असतो.
अंधश्रद्धा: बाबात्याच चौकात एकाच जागी बसलेला असतो.
वास्तव: पंधरादिवसांत त्याने त्याच चौकात तीन वेळा जागा बदलल्या.
अंधश्रद्धा: बाबाकधीच नैसर्गिक विधीही करीत नाही.
वास्तव: ज्याठिकाणी तो बसलेला असतो, त्याच्या आजूबाजूला विष्ठा पडलेली असते.
बातम्या आणखी आहेत...