आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी समस्येच्या तळाशी, ग्रॅव्हिटी, गंजलेल्या हीच समस्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्योतीनगरवॉर्ड क्रमांक १०० मध्ये १५ लाख लिटर पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम दोन लाइनमनवर आहे. जोपर्यंत जुनी पाइपलाइन बदलून ग्रॅव्हिटी पाइपलाइनने पाणी सोडणे बंद होणार नाही, तोपर्यंत येथील पाणी वितरण सुरळीत होणार नसल्याचे समोर आले आहे.
या वॉर्डात दोन हजार ७३० अधिकृत नळांची संख्या आहे. या सर्व वॉर्डाला पाच टप्प्यात पाणी सोडण्यात येते. पाणी सोडण्यासाठी दोन वॉलमनची नविड मनपाकडून करण्यात आली होती. आताही याच दोन वॉलमनवर पाणी सोडण्याची पाण्याच्या टाकीची जबाबदारी आहे. या वॉर्डात स्वतंत्र १५ लाख लिटरची पाण्याची टाकी आहे. या टाकीतून नागरिकांना चौथ्या दविशी एक तास पाणी मिळते. काही भागात ग्रॅव्हिटी पाइपलाइन असून त्या मार्फत पाणी येणाऱ्या नळांना रात्री अपरात्री पाऊण तास पाणी वितरित करण्यात येते. मात्र त्याचा दाब अत्यंत कमी असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. यामुळे टँकरने पाणी आणावे लागत आहे. समांतरकडे पाणी वितरणाचे काम हस्तांतरित झाल्याने कामात काही बदल होणार असल्याची आशा नागरिकांना वाटत होती. मात्र दहा महिने झाले तरी, पाणी वितरण, नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामासह कर्मचाऱ्यांच्या संख्येतही समांतरने कोणतेच बदल केले नाही.

मुख्य अडचण मुख्य उपाय....
३२ टक्के नागरिकांना मुख्य यंत्रणेशी जोडलेले नाही. त्यांना उताराने पाणी आणणाऱ्या व्यवस्थेशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांना पाणीपुरवठ्यासाठी पुरेशा दाबाने पुरेसे पाणी मिळत नाही.

उतारानेयेणाऱ्या जलवाहिनीचे पाणी वापरणाऱ्या जोडणी धारकांना मुख्य यंत्रणेशी जोडावे लागेल. त्यासाठी नव्याने स्वतंत्र जलवाहिनी टाकावी लागेल. त्याला कंपनीने प्राधान्य द्यावे.

- २,७३० अधिकृतनळ
- १० अनधिकृतनळ

असा आहे हा वाॅर्ड
शहरातील उच्चभ्रू आणि उच्च मध्यमवर्ग यांची वसाहत असलेला हा परिसर आहे. इथे पाण्याची मोठी टाकी आहे. आमदार अतुल सावे, माजी महापौर सौ. रहाटकर, नगरसेविका सौ. सुमित्रा हाळनोर याच भागात राहतात. सध्या गाजत असलेले राका यांनी बांधलेला तरण तलाव याच परिसरात आहे. सत्ताधारी नगरसेवकच या भागाचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधी आहेत.

ग्रॅव्हिटी पाइपलाइन
पाण्याच्याटाकीत नक्षत्रवाडीतून येणारे पाणी येण्यास काही अडचण आल्यास नागरिकांची गरज भागविण्यासाठी फारोळ्यातून एक पाइप लाइन थेट शहरात आणली असून त्याचे कनेक्शन घरगुती नळांना जोडले आहे. काही भागातील नागरिकांना टाकीच्या पाण्याऐवजी याच पाइपलाइनने पाणी देण्यात येते.
- पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने मुबलक पाणी मिळत नाही. वेळ आल्यास टँकरने गरज भागवावी लागते. नुसते नळाला मीटर लावून भागणार नाही. केशवश्रीखंडे, ज्योतीनगर
- जास्त पाहुणे आल्यास नळाचे पाणी कमी पडते. पर्याय नसल्याने टँकरने पाणी आणावे लागते. समांतरने फक्त पैसे उकळण्यासाठी मीटर लावले आहेत. रंजनातुळशी, अजरामर अपार्टमेंट
- येणारे पाणी चौथ्या दविशी येते. येणारे पाणी कमी असते. नळाला मीटर लावूनदेखील पाण्याच्या फोर्समध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. वैभवीअभ्यंकर, अजरामर अपार्टमेंट
काय म्हणतात नागरिक

काय म्हणतात नगरसेवक
- यावॉर्डात पूर्वी गिरजाराम हाळनोर नगरसेवक होते. त्यांनी पाच वर्षात वॉर्डातील सगळ्यांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले. नवीन पाइपलाइनशविाय पाणीपुरवठा चांगला होणार नसल्याचे स्पष्ट केले. लोकसंख्या वाढली. त्यानुसार मुबलक पाणी टाकीत येणे आवश्यक आहे. दविसातून दोन वेळ या टाक्या भरल्या पाहिजे, असे विद्यमान नगरसेविका सुमित्रा हाळनोर यांनी सांगितले.